पावसामुळे विधिमंडळातील वीज गेल्याने पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस पाण्यात : नीलम गोऱ्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबईमध्ये पावसाचे पाणी तुंबते त्यामुळे अधिवेशनाच्या कामकाजामध्ये व्यत्यय येतो, म्हणून यंदाचे २०१८ चे पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूरला घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र आज दि. ६ जुलै रोजी नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने नागपूरच्या विधानभवन इमारतीमध्ये विजेच्या दालनात पाणी साचल्याने संपूर्ण वीज गेली होती. तसेच विधानभवन परिसरामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे आजच्या दिवसाचे दि. ६ जुलैचे संपूर्ण कामकाज विधानभवनात वीज नसल्याने तहकूब करावे लागले.

विधानपरिषद सभागृहामध्ये आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या कार्यक्रमात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान होते. तेही वीज नसल्याने व जनरेटरचा साऊंड सिस्टीमला कनेक्शन नसल्याने माईकचा वापर न करताच घ्यावे लागले. सदनाच्या माईक व्यवस्थेला जनरेटर बँक अप नव्हता. परीणामी वीजपुरवठा सुरु झाला तरी विधानपरिषदेचे काम पावसाचा जोर वाढला असता तर कामकाज खंडीत करायची वेळ आली असती.अशी नामुष्की गेल्या तीस वर्षात आली नव्हती.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a45a312f-8124-11e8-8d10-ab0cc5d69dc9′]

मुंबईमध्ये समुद्र असल्याने पाणी साचते नागपूरमध्ये समुद्रही नाहीे. तरीही मुंबईमध्ये पावसामुळे वीज गेल्याने अधिवेशनाचा दिवस वाया गेला . असे कधीच झाले नाही, त्यामुळे नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याचा नेमका उद्देश काय होता हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आहे. अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी प्रशासनाने काय तयारी केली होती हा प्रश्न निर्माण होतो.सभापतींच्या दालनात आम्ही ९ ते ९.३० व १०.३० ते ११.३० अंधारातच १०/१२ जण मोबाईल चे दिवे लावून वाट पहात होतो.तेथेही आम्हाला विधीमंडळात मेणबत्ती,दिवे,बँटरी सिक्युरिटी वा प्रशासनाने तयारी ठेवली नव्हती. पावसाळी परिस्थितीबाबत मुंबईला एक न्याय नागपूरला एक न्याय असा दुजाभाव करत आहेत. मुंबईहून नागपूरला अधिवेशन घेण्याचा हेतू काही असो आजचे कामकाज वाया गेल्याने बऱ्याच समज, गैरसमजांवर प्रकाश पडला आहे. शेतकरी व सर्व महाराष्ट्राला पाऊसाची गरज आहे परंतू ज्यांचे नुकसान झाले व त्रास झाला त्याबाबत मला खेद वाटतो