बायांनो ! अत्याचार होतो तेव्हाच आवाज उठवा : सिंधुताई सपकाळ 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन  – #MeToo मोहिमेचे वादळ भारतात जोरदार सुरु आहे. ज्या-ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाले आहेत ते  #MeToo द्वारे बोलत आहेत. मात्र, अत्याचार झाला तेव्हाच का बोलत नाही असा सवाल सिंधुताई सपकाळ यांनी केला आहे.
शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथे उत्कर्ष मल्टिस्टेट पतसंस्थेचा वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांना बोलावण्यात आले होते, यादरम्यान बोलत असतांना त्यांना #MeToo या याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले.
मात्र १० वर्षांनंतर असे आरोप करणे हे चुकीचे आहे. काळजात कळ उठते तेव्हा माणूस गप्प राहू शकत नाही. त्यामुळे जेव्हा अत्याचार झाला तेव्हाच आवाज उठवत का नाही ? असा सवाल त्यांनी केला.
इतकेच नव्हे तर अत्याचारासाठी शिक्षा ही ठरलेली आहे, त्याचवेळी आवाज उठवा, त्यांना शिक्षा मिळेल. परंतु या प्रकरणांमुळे जे दोषी नाहीत त्यांना सुद्धा शिक्षा भोगावी लागत आहे. आरोप करणारी महिला ही कुणाची तरी पत्नी, बहिण आणि आई आहे. तसेच पुरुष सुद्धा कुणाचा तरी मुलगा, भाऊ आणि वडील आहेत. असेही सिंधुताई म्हंटल्या.