‘IAS’ अधिकाऱ्याची ‘दादागिरी’, बंगल्यात शिरलेलं पाणी काढण्यासाठी खोदला ‘पक्का’ रस्ता

नवी दिल्ली : वृत्तंसंस्था – एका आयएएस अधिकाऱ्यांने आपल्या बंगल्यात पाणी शिरल्याने ते पाणी बाहेर काढण्यासाठी थेट रस्ताचं खोदला. त्यांच्या सरकार बंगल्यात पावसाचे पाणी जमा होऊ नये म्हणून सरकारी शाळेकडे जाणारा एक रस्ताच खोदला. हा खड्डा एवढा मोठा आहे की त्याला नाल्याचे स्वरुप आले आहे, शाळकरी विद्यार्थी जीव मुठीत धरुन हा नाला ओलांडत आहेत. हा प्रकार मध्यप्रदेशमधील आहे.

सीईओच्या बंगल्यात पावसाचे पाणी शिरु लागल्याने ते पाणी घालवण्यासाठी पूर्ण रस्ताच खंदण्यात आला आहे. इंजिनिअरने तर सांगितले की आमच्याकडे पाईपच नाही. आता हा रस्ता २ महिन्यासाठी असाच खोदलेला असू शकतो. याच शहरात पाणी शिरले असून वस्तीतील लोक पाण्यात आहेत तर आयएएस अधिकाऱ्याच्या घरात पाणी शिरु नये म्हणून थेट रस्ताच खोदण्यात आला.

मध्यप्रदेशाच्या रायसेन जिल्ह्यातील लोक या आयएएस अधिकाऱ्यांच्या निर्णयाला वैतागले आहेत, अवी प्रसाद असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. मध्यप्रदेश सरकारने या बाबीची गंभीरतेने दखल घेतली आहे, रायसेन जिल्ह्यातील प्रभारी मंत्री हर्ष यादव यांनी हे प्रकरण गंभीर आहे. त्यांनी सांगितले की या प्रकरणाची तपासणी करण्यात येईल आणि यात दोषी आढळले तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त