पत्नी अभिनेत्री स्मिता पाटीलची आठवण काढत राज बब्बर ‘भावूक’, फोटो शेअर करत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेते आणि नेते राज बब्बर यांनी 13 डिसेंबर रोजी दिवंगत पत्नी स्मिता पाटीलच्या पुण्य स्मरणादिवशी तिचा फोटो शेअर तिची आठवण काढली आहे. राज बब्बर यांनी ट्विटरवर स्मिताचा फोटो शेअर करत लिहिलं की, “आजपासून काही दशकांपूर्वी तू गुपचूप निघून गेलीस. हा दिवस मला आठवण करून देतो की, प्रत्येक सरणाऱ्या वर्षासोबत तुझी आठवण काढली जाईल.”

स्मिता पाटीलचं करिअर केवळ 10 वर्षांचंच होतं. ती खूप सुंदर आणि दमदार अभिनेत्री होती. स्मिताचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी झाला होता. अवघ्या 31 व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. 13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता पाटीलचं प्रेग्नंसीच्या कॉम्प्लिकेशन्समुळे निधन झालं होतं. तिच्या निधनानंतर तिचे तब्बल 14 सिनेमे रिलीज झाले होते. तिचे वडिल शिवाजी राय पाटील हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा एकमेव मुलगा प्रतिक बब्बर हा देखील अभिनेता आहे.

स्मिता पाटीलनं आपल्या करिअरच्या सुरुवात अवघ्या 16 व्या वर्षी न्यूज रिडर म्हणून केली होती. याचदरम्यान तिची ओळख प्रसिद्ध प्रोड्युसर आणि डायरेक्टर श्याम बेनेगलसोबत झाली. त्यांनी स्मिताची प्रतिभा ओळखून तिला चरण दास चोर या सिनेमात संधी देत छोटी भूमिका दिली. यानंतर त्यांनी बिग बी अमिताभ सोबत नमक हलाल आणि शक्ति या सिनेमात काम केलं. हे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले.

स्मिता पाटील, राज बब्बरसोबत आपल्या अफेअरमुळे चर्चेत राहिली. आज की आवाज या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. स्मिताची आई या नात्यानं खुश नव्हती. कारण राज बब्बर यांचं नादिरा बब्बर सोबत लग्न झालं होतं आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/