Raj Kundra Case | राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात पत्नी शिल्पा शेट्टी बनली साक्षीदार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Kundra Case | बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra Case) हा पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणाबाबत चांगलाच अडचणीत सापडला आहे. राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणावरुन चित्रपट सृष्टीत मोठी खळबळ उडाली. आता मात्र अडचणीत आणखी भर पडताना दिसत आहे. राज कुंद्रासह 8 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तर राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी साक्षीदार बनली आहे. याचबरोबर शर्लिन चोप्रासह 55 जण साक्षीदार आहेत.

राज कुंद्राने 2015 साली विहान इडस्ट्रीज लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीवर शिल्पा शेट्टी पाच वर्ष संचालक होती. 2020 मध्ये शिल्पाने या कंपनीचा राजीनामा दिला. या कंपनीशी संबध असलेल्या हॉटशॉट अ‍ॅप आणि बॉल फेम या अ‍ॅपची माहिती नसल्याचे शिल्पा शेट्टींनी सांगितले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याचे शिल्पाने पोलिसांना सांगितले आहे.

राज कुंद्रा (Raj kundra) मुख्य आरोपी असलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने बुधवारी (15 सप्टेंबर) रोजी 1500 पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केले.
कुंद्राच्या कंपनीचा आयटी हेड रायन थॉर्पलाही जुलै महिन्यात अटक केली होती.
पुरवणी आरोपपत्रात शिल्पासह साक्षीदार दाखवण्यात आले आहेत.
साक्षीदारांना न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. त्यांनी आरोपींच्या विरोधात जबानी दिली.
शिल्पा शेट्टी अद्याप राज कुंद्रा विरोधात काहीही बोललेली नाही.
कुंद्रा आणि थॉर्प विरोधात हे पुरवणी आरोपपत्र असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.
तर, राज कुंद्राचा नातेवाईक प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर (Pradip Bakshi and Yash Thakur) यांना फरार आरोपी असल्याचं म्हटलं आहे.

Web Titel :- Raj Kundra Case | shilpa shetty shown as a witness in raj kundra porn film case chargesheet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘हे सरकार सर्व जाती धर्मासाठीचं आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारं सरकार’

Surekha Punekar | ‘घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय?’ – लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर

Ola Scooter खरेदी करू शकता रात्री 12 वाजेपर्यंतच, पहिल्या दिवशीच प्रत्येक सेकंदाला विकल्या गेल्या 4 स्कूटर !