Raj Kundra | राज कुंद्राने दीड वर्षात 100 पेक्षा अधिक पॉर्न मुव्हीज तयार करून कमावले कोट्यवधी रुपये

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  अश्लिल चित्रपटांच्या निर्मिती प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) क्राईम ब्रांचने (Crime Branch) बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक (Arrest) केली आहे. तपासामध्ये अनेक धक्कदायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीने हवाल्याच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, दीड वर्षात राज कुंद्रानं (Raj Kundra) 100 पेक्षा अधिक पॉर्न मुव्हीजची (Porn movie) निर्मिती केली होती. तसंच याच्या माध्यमातून त्यानं कोट्यवधी रूपयांचीही कमाई केल्याचे समोर आले आहे.

राज कुंद्राच्या अंधेरी पश्चिम (andheri west) येथील वियान या ऑफिसवर क्राईम ब्रांचने छापा टाकला होता.
यावेळी तिथे पोलिसांना मोठ्या प्रमाणात डेटा हाती लागला.
इतकंच नाही तर काही डेटा डिलीटही करण्यात आला होता.
हा डेटा क्राईम ब्रांच फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सच्या (Crime Branch Forensic Expert) मदतीनं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनुसार ऑगस्ट 2019 पासून राज कुंद्रा अश्लिल चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सहभागी होता.

100 पॉर्न फिल्मची निर्मिती

तसंच त्यानं आतापर्यंत 100 पेक्षा अधिक पॉर्न फिल्म्सची निर्मिती केली आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून राज कुंद्रानं कोट्यवधींची कमाई केली होती. ज्या अ‍ॅपवर हे चित्रपट अपलोड केले जातात त्याचे 20 लाखांच्या जवळ सबस्क्रायबर्स (Subscribers) आहेत.
दरम्यान, वेबसाईट पेक्षा अ‍ॅपचा वापर करणं सोपं असल्यानं अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे.
याशिवाय वेबसाईट बंदही करण्यात येते, परंतु अ‍ॅपबाबत तसं होत नाही. असं क्राईम ब्रांचचं म्हणणं आहे.

तपासात सहकार्य नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्रा आपल्यावरील आरोप फेटाळत असून बऱ्याच प्रश्नांची तो उत्तरंही देत नाही. तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर येत आहे.
आपण कोणतीही पॉर्न मुव्ही तयार केली नसल्याचं राज कुंद्राचं म्हणणं आहे. परंतु त्याच्याविरोधात गुन्हे शाखेकडे अनेक पुरावे आहेत.

Web Title : raj kundra case updates one and half year made more 100 porn movies earned crores rupees police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kolhapur News | दुर्देवी ! ओढ्याच्या पुरातून जात असताना दुचाकी कलंडली, हवाई दलातील जवान गेला वाहून

Aurangabad Crime | आईसमोर मित्र वाईट बोलल्यामुळं भर रस्त्यात मित्राचा सपासप वार करुन खून

Raigad Landslides | रायगड जिल्हयात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू, ढिगार्‍याखाली 30 हून अधिकजण अडकल्याची भीती – जिल्हाधिकारी निधी चौधरी