Raj Kundra Porn Film Case| राज कुंद्राच्या विरोधात बोलणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला मिळतेय जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  अश्लील व्हिडिओ (Pornography case) बनवल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक (Raj Kundra Porn Film Case) केली आहे. परंतु राजच्या वकिलाने न्यायालयात त्यांनी बनवलेले व्हिडिओ अश्लील प्रकारात मोडत नसल्याचे सांगत राजच्या अटेकवर आक्षेप घेतला. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी राज कुंद्रावर न्यूड ऑडिशनची (nude audition) मागणी केल्याचा आरोप (Raj Kundra Porn Film Case) करणारी मॉडेल, अभिनेत्री सागरिका शोना सुमन (Sagarika Shona Suman) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. राजच्या विरोधात बोलल्यामुळे तिला जीवे मारण्याची धमकी (Threat) मिळत असल्याची माहिती सागरिकाने दिली आहे.

सोशल मीडियावरुन धमकी

सागरिकाला फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जीवे मारण्याची धमक्या दिल्या जात आहेत. काही जण तर फोन करुन तिला धमक्या देत आहेत. धमक्या देणारे बहुतांश अकाऊंट फेक आहेत. किंवा दुसऱ्याच नावाने वापरले जात आहेत. जर तिने राज विरोधात केलेली तक्रार मागे घेतली नाही. तर तिला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, अशी धमकी मिळत असल्याचा दावा तिने केला आहे. या विरोधात तिने पोलीसांत तक्रार (police complaint) दाखल केली आहे. राज कुंद्रा प्रकरणात सागरिका साक्ष देखील देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सागरिकाकडून मोठे खुलासे

राजला अटक झाल्यानंतर सागरिका माध्यमांसमोर आली आहे. तिने या प्रकरणात मोठे खुलासे केले आहेत. राज पॉर्न चित्रपटांची (porn movies) निर्मिती करतो. तिला देखील अशा चित्रपटांची ऑफर मिळाली होती. तिला ऑनलाइन ऑडिशन (Online audition) देण्यास सांगितले होते. शिवाय नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओंची (nude photos and video) मागणी करण्यात आली होती. अर्थात यासाठी तिने नकार दिला होता. त्यावेळी राज कुंद्राने तिला फोनवर संपर्क साधून अत्यंत अश्लील शब्दात तिच्याशी बोलला होता, असा खळबळजनक दावा तिने केला आहे.

पोलिसांना मदत करण्यास तयार

राज विरोधात पुरावे शोधण्यासाठी पोलिसांना मदत करण्यास तयार असल्याचे तिने सांगितले.
मला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलवावं.
जर मला हे इतके मोठे रॅकेट आहे याचा अंदाज आला असता तर त्यांचे कॉल आणि व्हि़डिओ
रेकॉर्ड करुन ठेवले असते.
पण हरकत नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या डेटाबेसमध्ये नक्की ते सापडेल.
या रॅकेट बाबत शिल्पा शेट्टीला ही नक्कीच माहिती असल्याचा दावा सागरिकाने केला आहे.

Web Title : Raj Kundra Porn Film Case | model sagarika suman files complaint after receiving threatening calls

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | आरएमसी प्लांट मालकांचा बंद अखेर मागे, बिल्डर्स असोसिएशनकडून दरवाढीचे आश्वासन; प्रदीप वाल्हेकर यांची माहिती

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

Satara Landslide | सातार्‍यात दरड कोसळली; NDRF ने 6 मृतदेह बाहेर काढले, 8 जण अजूनही बेपत्ता