Raj Kundra Porn Film case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; उमेश कामतच्या ऑफिसवर पोलिसांचा छापा; 70 अश्लील व्हिडीओ लागले हाती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Kundra Porn Film case | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणी (Raj Kundra Porn Film case) अटक करण्यात आली. अश्लिल चित्रपटांची निर्मिती करून ते अ‍ॅपवर अपलोड करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. याचवर्षी फेब्रुवारीत समोर आलेल्या या प्रकरणाचा सलग सहा महिने तपास केल्यानंतर पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती. मात्र यांनतर अनेक खुलासे समोर येत आहेत. राज आणि त्याचा बिझनेस पार्टनर उमेश कामत (Umesh Kamat) हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर, क्राईम ब्रांचनं उमेशच्या ऑफिसवर छापा मारला. यात तब्बल 70 अश्लील व्हिडीओ तपासा दरम्यान हाती लागले आहेत.

मागील काही दिवसापासून राज कुंद्रा (Raj Kundra) आणि उमेश कामत (Umesh Kamat) हॉटशॉट (Hotshot) नावाचा एक वेब सीरिज अ‍ॅप चालवत होते. यावर आतापर्यंत 90 व्हिडीओज शेअर केले गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ तीस मिनिटांच्या या व्हिडीओत मोठ्या प्रमाणावर अश्लील दृश्य आहेत. म्हणजेच हे पॉर्न व्हिडीओ (Porn videos) नाहीत असा दावा सातत्याने राज कुंद्रा (Raj Kundra) करत आहे. तर, चौकशीच्या वेळी युकेमधील केनरिन कंपनीबरोबर त्याचे व्यवसायिक संबंध असल्याचं त्याने मान्य केलय. परंतु, त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पॉर्न व्हिडीओंची निर्मिती केलेली नाही असं तो सातत्याने सांगत आहे. तो फक्त एरॉटिक बोल्ड सीरिजची निर्मिती करत होता असा त्याचा दावा आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. असं पोलिसांनी सांगितलं.

Raj Kundra Porn Film case | raj kundra pornograpgy case mumbai police raid on umesh kamat office, 70 video recover from office of umesh kamat

या दरम्यान, राज कुंद्रा लंडनमधील केनरिन (Kenrin) नावाच्या एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करतो. ही कंपनी भारतात हॉटशॉट (Hotshot) नावाचं एक अ‍ॅप चालवते. या अॅपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट अथवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. असं पोलिसांनी सांगितलं. यासच, राज कुंद्राने या अ‍ॅपवरील अश्लील व्हिडीओंद्वारे (Porn videos) पाचशे कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या माध्यमातून एका सर्वेनुसार देशातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. यावरून हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. आणि त्यातून लाभ सुद्धा कोट्यावधीचा मिळत होता.

दरम्यान, अभिनेता उमेश कामतने काही वृत्तवाहिन्यांनी त्याचा फोटो दाखविल्यामुळे स्पष्टीकरण दिले
आहे. तो म्हणाला की, आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील
एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न
करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे
होणार्‍या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार
धरले जाईल.

या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन.

उमेश कामत

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Raj Kundra Porn Film case | raj kundra pornograpgy case mumbai police raid on umesh kamat office, 70 video recover from office of umesh kamat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update