Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra Porn Film Case) याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राज कुंद्रा पॉर्न बिझनेस (Raj Kundra Porn Film Case) बंद होऊ नये यासाठी हॉटशॉट अ‍ॅप (Hotshot App) बंद झाल्यास प्लान बी तयार केला होता. यामध्ये पॉर्न फिल्मचे शूटिंग थांबवून त्याच्या ‘बॉलिफेम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) मॉडेल आणि अभिनेत्रींकडून लाईव्ह स्ट्रीमिंग (Live streaming) करण्याची तयारी राज कुंद्राने केली होती. त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप चाटमधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

राज कुंद्राच्या व्हॉट्सअ‍ॅप चाटमधून (whatsapp chat) लाखो रुपयांची उलाढाल सुरु असल्याचे समोर आले आहे. मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये पॉर्न चित्रपट (Porn Movie) तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत (Vian Industrial Estate Company) मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या उमेश कामत (Umesh Kamat) याच्या चौकशीतून राज कुंद्रा याचे नाव समोर आले आहे.

Raj Kundra Porn Film Case | raj kundra was going do live streaming actress

कामतने पोलिसांना सांगितले…

कामत याला गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये
कामतने सांगितले की, लंडन येथील केनरिन प्रायव्हेट लिमिटेड (Kenrin Pvt. Ltd.) या कंपनीचे
मालक प्रदीप बक्षी (Pradeep Bakshi) हे राज कुंद्राचे भाऊजी आहेत. राजने 5 फेब्रुवारी 2019
रोजी भागीदारीत आर्म्स प्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Arms Prime Media Pvt) ही कंपनी
स्थापन केली. त्यानंतर केनरिन कंपनीसाठी हॉटशॉट हे अ‍ॅप विकसित केले. पुढे जुलै ते ऑगस्ट
2019 या कालावधीत हे अ‍ॅप 25 हजार डॉलरला केनरिन कंपनीला विकले.

कामत केनरिन कंपनीचा भारतातील को-ऑर्डिनेटर

राज कुंद्रा याच्या सांगण्यावरुन कामत हा केनरिन कंपनीचा भारतातील को-ऑर्डिनेटर म्हणून काम पहात होता. कामत हे काम कुंद्रा याच्या कार्यालयातून पहात होता. पुढे 11 डिसेंबर 2019 रोजी कुंद्राने या कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचा कर्मचारी रायन थॉर्प हा हॉटशॉट संदर्भात माहिती घेत होता. याच अ‍ॅपवरुन पॉर्न फिल्म प्रसारित केल्या जात होत्या.

राज कुंद्राचा प्लान बी

गुगल प्लेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हॉटशॉट डिजिटल अ‍ॅप्लिकेशन 18 नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आले. परंतु चॅटमधील संभाषणावरुन मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वांनी असे काही झाल्यास प्लान बी यापूर्वीच तयार ठेवला होता. पॉर्न फिल्मचे शूटिंग थांबवून त्याच्या ‘बॉलिफेम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मॉडेल (Model) आणि अभिनेत्रींकडून (actress) लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची तयारी त्याने केली होती.

कोट्यावधीची कमाई

राज कुंद्रा हा पॉर्न फिल्म आणि वेबसीरिज बनवण्यासाठी आर्थिक मदत करत होता. एक पॉर्न फिल्म बनवण्यासाठी 5 ते 7 लाख रुपये खर्च येत होता. पुढे यामधून राज कुंद्रा कोट्यावधी रुपयांची कमाई करत होता. असा संशय पोलिसांना आहे.

हे देखील वाचा

100 Crore Recovery | ठाकरे सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाकडून झटका, HC ने दोघांच्याही याचिका फेटाळल्या

Pune Crime | लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगारावर पोलिस आयुक्तांची स्थानबध्दतेची कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Raj Kundra Porn Film Case | raj kundra was going do live streaming actress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update