Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी सामिल? हिच्याकडे मागितला होता Nude Video

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Kundra Porn Film Case | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Actress Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. राज कुंद्रा (Raj Kundra Porn Film Case) याच्या व्हिआन कंपनीच्या ऑफिसमधून काही अश्लील चित्रफिती हाती लागल्या आहेत. लंडनमधली केनरीन कंपनी महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये ब्रेक देऊ, असं आमिष दाखवून त्यांना न्यूड (nude) सीन करायला लावायचे. यावरूनच मॉडेल सागरिका शोना सुमनने (Sagarika Shona Suman) देखील मोठे खुलासे केले आहेत. राज कुंद्राच्या ज्या ज्या कंपन्या आहेत, त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) देखील भागीदार आहे. यावरून त्याच्या कंपनीतून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा समावेश आहे का? यावर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

राज कुंद्रा पॉर्न चित्रपटांची (Raj Kundra Porn Movies) निर्मिती करतो. सागरिका शोना सुमनला (Sagarika Shona Suman) देखील अशा चित्रपटांची ऑफर मिळाली होती. तिला ऑनलाईन ऑडिशन देण्यास सांगितलं होतं. तसेच, नग्न (nude) अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओंची देखील मागणी करण्यात आली होती. म्हणजेच, तिने यासाठी नकार दिला त्यावेळी राज कुंद्रा याने सागरिकासोबत फोनवर संभाषण केलं होतं. अत्यंत अश्लील शब्दात तो तिच्याशी बोलत होता. असे गंभीर आरोप सागरिकाने केले आहेत.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या दरम्यान, राज कुंद्रा विरोधात पुरावे शोधण्यासाठी सागरिका शोना सुमन (Sagarika Shona Suman) पोलिसांना मदत करण्यास तयार आहे.
‘मला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलवावं.
जर मला हे इतके मोठे रॅकेट आहे याचा अंदाज आला असता तर त्यांचे कॉल आणि व्हिडीओ मी आधीच रेकॉर्ड करून ठेवले असते.
असं तिने म्हटलं आहे. पुढे ती म्हणाली की,
पण हरकत नाही WhatsApp च्या डेटाबेसमध्ये नक्कीच ते सापडतील.
या रॅकेटबाबत शिल्पा शेट्टीला (Actress Shilpa Shetty) देखील नक्कीच माहित आहे.
कारण फोनवर बोलताना ते तिच्याबद्दलही बोलत होते.
असं देखील सागरिका शोना सुमनने म्हटलं आहे.

Web Title :- Raj Kundra Porn Film Case | sagarika shona suman rady to help mumbai police in raj kundra pornography case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील 43 वर्षीय महिलेची फेसबुकवरून झाली त्याच्याशी ओळख, पुढं घडलं भलतच

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला