Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून लैंगिक शोषणाचा आरोप, म्हणाली – ‘नको-नको म्हणत असतानाही करत रहायचा KISS’

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   पोर्न व्हिडिओ प्रकरणात (Raj Kundra Porn Film Case) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. राज कुंद्रा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. कोर्टाने त्याचा जामीन अर्जही फेटाळला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर काही अभिनेत्री आणि मॉडल्स आता राज कुंद्रा आणि त्याचे अ‍ॅप हॉटशॉट्सच्या विरूद्ध उघडपणे समोर (Raj Kundra Porn Film Case) आल्या आहेत. यामध्ये शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) च्या नावाचाही समावेश आहे. आता शर्लिन चोपडाने राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

एफआयआर सुद्धा दाखल

बॉलीवुड (Bollywood) अभिनेत्री शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) कथित प्रकारे पोर्नोग्राफी प्रकरणात आपला जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल समोर हजर झाली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, या दम्यान तिने राज कुंद्राच्या विरूद्ध लैंगिक शोषणाबाबत आपली एफआयआर सुद्धा दाखल केला आहे.

मीटिंगनंतर एका मेसेजवरून जोरदार वाद

आपल्या तक्रारीत तिने खुलासा केला की, 2019 च्या सुरुवातीला राज कुंद्राच्या बिझनेस मॅनेजरने तिला एका प्रस्तावासाठी बोलावले, त्यांना प्रस्तावावर चर्चा करायची होती.
27 मार्च, 2019 ला बिझनेस मीटिंगनंतर एका मेसेजवरून जोरदार वाद झाल्याने राज कुंद्रा न सांगता माझ्या घरी आला.

जबदस्तीने तिला किस करण्याचा प्रयत्न

शर्लिन चोपडाने तक्रारीत दावा केला आहे की, राज घरी आल्यानंतर त्याने शर्लिनने नकार देऊनही जबदस्तीने तिला किस करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा तिने विरोध केला.
शर्लिनचे म्हणणे आहे की, एका विवाहित पुरुषासोबत तिला संबंध ठेवायचे नव्हते
आणि बिझनेस आणि एन्जॉय एकत्र करायचे नव्हते.

 

त्यावेळी मी घाबरले होते…

तिने आरोप केला की, नकार देऊन सुद्धा राज जेव्हा थांबला नव्हता.
तेव्ही मी खुप घाबरले होते.
काही वेळानंतर, ती त्याला ढकलण्यात यशस्वी झाली आणि वॉशरूममध्ये गेली.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल

राज कुंद्रावर भारतीय दंड विधान, कलम 376 r/w कलम 384, 415, 420, 504, 506, 354 (a) (b) (d) 509, भारतीय दंड संहिता कलमाच्या अंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
तर, यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 के 67, 67 (ए), महिला कायदा 1986 च्या
असभ्य प्रतिनिधित्वचे कलम 3 आणि 4 चा सुद्धा समावेश आहे.

 

Web Title : Raj Kundra Porn Film Case | sherlyn chopra accuses raj kundra of sexual assault says he keep doing kiss even after i refuse

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

School Fee | खासगी शाळांच्या शुल्कात 15 % कपातीच्या निर्णयाविरूध्द संस्थाचालक न्यायालयात जाणार

Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे दर

Pune Rain | पुण्यासह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज