Coronavirus : ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात ‘उध्दवा चांगलं तुझं सरकार’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना राज्यात होत असलेल्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारने चांगले काम केले आहे. त्यासाठी मी सरकारचे अभिनंदन करतो. उपाययोजना करायला थोडा उशीर झालाय पण सरकारने योग्य पावले उचलली आहेत, असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

कोरोनाच्या संदर्भात काल माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी, अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली. ज्यांनी आजवर डॉक्टरांवर हात उचलले आहेत. त्यांना आता त्यांचे महत्व कळाले असेल, अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांचे कौतुक केले.

कालचा जो बंद झाला त्यामध्ये काही मुठभर लोकांना याचे गांभीर्य अजूनही समजत नाही. जर भारतात हे पसरले तर देशात 60 टक्के लोकांना याची लागण होऊ शकते, म्हणजे हा आकडा किती भयंकर असू शकतो याचा अंदाज यायला हवा. हे आवरण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहेत का? असा सवालही राज यांनी यावेळी केली.

प्रत्येकाच्या दरवाज्यावर टकटक झाल्याशिवाय आम्हाला समजणारच नाही का? महाराष्ट्रातील जनततेला हात जोडून विनंती आहे की याचे गांभीर्य ओळखा आणि सरकारच्या आवाहनला प्रतिसाद द्या. 31 तारखेपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे मात्र, लोकांनी सहकार्य केलं नाही तर ही तारीखही पुढे जाऊ शकते. हे संकट लवकरात लवकरत टळो, अशी प्रार्थना करतो. हातावर पोट असलेल्यांन सरकारने मदत करावी, कामगारांचा पगार कंपन्यांनी कापू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.