Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का ! उत्तरसभेतील ‘त्या’ कृत्यामुळे गुन्हा दाखल होणार

मंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी ठाण्यातील (Thane) उत्तरसभेत चौफेर फटकेबाजी केली (MNS Uttar Sabha). राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खास करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना (NCP Leaders) लक्ष्य केलं. मात्र या सभेदरम्यान राज ठाकरेंनी तलवार (Sword) दाखवणं त्यांना भोवलं आहे. तलवार दाखवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं गृह विभागानं (Maharashtra Home Department) स्पष्ट केलं आहे. (A case will be registered against MNS chief Raj Thackeray under Arms Act in connection with an event in Thane, where he raised a sword)

राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार दिली होती. त्यासोबतच राज ठाकरे यांच्या भाषणाची तपासणी होणार असल्याची माहिती समजत आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, उगारणे आणि दाखवणे यासंदर्भात कायद्यात काही तरतुदी आहेत. याआधी महाविकास आघाडीमधील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला होता. याबाबत भाजप नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांनी तक्रार दाखल केली होती.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात मशिदीच्या भोंग्यावरून (Loudspeakers) सरकारला इशारा दिला. येत्या 3 तारखेला म्हणजेच ईदच्या अगोदर मशिदींवरील भोंगे (Loudspeakers In Mosques) उतरवले पाहिजेत (Loudspeakers for azaan). नाहीतर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजवली जाणारच त्यानंतर पुढचंही ठरलं आहे.
माझ्या भात्यातला तो पुढचा बाण मी अजुन काढलेला नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे, राष्ट्रवादीचे नेत्यांवर टीका केली.
मात्र आता त्यांचं भाषण तपासलं जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
यावर अद्याप मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा