‘कोकणवासियांचा मेळावा’ राज ठाकरे कडाडले

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन

कोकणाकडे सर्वच राजकीय पक्षाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे कोकणाची अवस्था दुर्गम झाली आहे. कोकणात कोट्यवधींचे रस्ते बांधल्यानंतर काही दिवसातच खड्डे पडतात कसे? असा सवाल राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित कोकणवासियांचा मेळाव्यात केला. यापुढे बोलताना ते म्हणाले, रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर कंत्राटदारांना जाब विचारा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रवींद्र नाट्य मंदिरात मुंबई, ठाणे व पालघर येथील मनसे कार्यकर्त्यांचा ‘कोकणवासियांचा मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी कोकणाकडे सर्वच राजकीय पक्षांकडून दुर्लक्ष झाल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आंबेनळी दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

गणपती दर्शनासाठी मुंबई, ठाण्याहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. विघ्नहराच्या दर्शनासाठी निघालेल्या गणेश भक्तासमोर हे विघ्न असते. शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागातील मनसे कार्यकर्त्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातील मनसैनिकांना बळ देण्याचं काम मुंबईतील कार्यकर्त्यांनी करायला हवे, असेही राज यावेळी म्हणाले.

कोकणातील जागा बळकावण्यासाठी परप्रांतीयांनी कंबर कसली आहे. कोकणात विध्वंसक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत आहे. कोकणची वाट लावणारे प्रकल्प जाणीवपूर्वक राबवले जात आहे, असा आरोप करीत त्यांनी जैतापूर आणि नाणार प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला. कोकणच्या लोकांना जमिनी विकू नये, असे आवाहनही राज यांनी यावेळी केले.

जाहिरात

(API) सहाय्यक निरीक्षकासह महिला उपनिरीक्षक (W PSI) नियंत्रण कक्षाशी सलग्‍न

जाहिरात

[amazon_link asins=’B074ZF7PVZ,B00KGZZ824′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b19a48e3-b364-11e8-9ea5-51bad874af7f’]