राज ठाकरे, अजित पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी माहाआघाडीमध्ये यावे असे सकारात्मक वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज (बुधवार) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. दादर येथील मनसेच्या एका कार्यकर्त्याच्या घरी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून महाआघाडीला मनसेचे इंजिन लागणार हे पहावे लागणार आहे.

मतांच विभाजन टाळण्यासाठी मनसेन आमच्यासोबत यावे असे दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी म्हटले होते. अजित पवार यांनी मनसेने सोबत येण्याचे आवाहन केल्यानंतर राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे हे आमच्यासोबत आता जरी दिसत असले तरी आगामी काळात आमच्यासोबत येतील असं दिसतं नाही असं सांगितलं होतं. आता खुद्द अजित पवारांची राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दादरमध्ये एका कार्यकर्त्याच्या घरीही भेट झाली आहे.

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनीही जाहीरपणे राज ठाकरे यांचं कौतुक करताना म्हणाले होते, राज ठाकरे हे शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत. एकवेळेस मनसे चांगली आहे पण शिवसेना नाही.