मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा गोप्यस्फोट, म्हणाले – ‘अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर वीजबिल माफीचा निर्णय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वीज बिल (Electicity Bill) दरवाढीच्या मुद्यावरून (Issue) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप (Allegation) करुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी वीज बिल माफ करु असे म्हटले. मात्र अदानी यांनी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर सरकारने कोणतंही वीज बिल माफ करणार नाही असं जाहीर केलं, हे सरकार वीज कंपन्यांच्या पाठिशी घालत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयात हजेरी लावल्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात पक्षाच्या कर्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना विविध मुद्यावर भाष्य केलं.

सरकारमधील मंत्र्यांचे घूमजाव

वीज कंपन्यांना कोणता फायदा झाला नाही म्हणून जर सरकार नागरिकांना पिळणार असेल तर हे कसं चालेल ? आधी वीजमंत्री म्हणतात वीज बिल माफ करु. यानंतर घूमजाव केलं. मग मी राज्यपालांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी मला शरद पवारांशी बोलण्यास सांगितले. मी त्यांच्याशीही बोललो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

अदानी – पवार यांच्या नेमकी काय चर्चा झाली ?

राज्यपालांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांशी वीजबिलाच्या संदर्भात बोलणं झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला ते पत्र पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएमईबी असेल किंवा टाटा असेल त्या सर्वांशी शरद पवार बोलणार होते. मात्र पाच-सहा दिवसांनी मला समजलं की गौतम अदानी शरद पवारांची भेट घेऊन आले. त्यात काय चर्चा झाली मला माहित नाही. पण त्यानंतर वीजबिल माफ होणार नाही, असं जाहीर केलं. त्यामुळे याबाबतीत पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि वीजमंत्र्यांना प्रश्न विचारणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

सरकार निर्दयीपणे कसं वागू शकते

राज्य सरकारवर आरोप करताना राज ठाकरे म्हणाले, सरकार आणि वीज कंपन्यांचं साटंलोटं आहे. सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकते हेच कळत नाही. मुलांच्या परीक्षांचा देखील ते विचार करत नाहीत. वीजबिल माफ करण्यासाठी कंपन्यांशी बोलावं लागेल. पण या चर्चाच आता थांबल्या आहेत. मग यात काहीतरी साटंलोटं असल्याशिवाय चर्चा थांबल्या असतील का ? सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

अयोध्येचा दौरा निश्चित नाही

राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार अशी चर्चा मध्यंतरी होती. यावर विचारण्यात आले असता राज ठाकरे म्हणाले, मी फक्त अयोध्येला जायची इच्छा व्यक्त केली. अद्याप कोणताही दौरा निश्चित झालेला नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.