Raj Thackeray | मनसेच्या मिसळ महोत्सवात राज ठाकरेंचा मिश्किल टोला; म्हणाले… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या भाषणातून एखाद्या राजकीय नेत्याची नक्कल फार सुंदर पध्दतीने करत असतात. नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भायखळा येथे मिसळ महोत्सव आयोजित केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलेल्या छोट्याश्या भाषणात चांगलाच विनोद करत उपस्थितांना पोट धरून हसवले.

याप्रकरणी मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून एक व्हिडीओ टाकण्यात आला आहे. आणि त्या व्हिडीओला ‘मनसेच्या मिसळ महोत्सवात मिसळीचा घमघमाट आणि राज साहेबांचे मिश्किल टोले!’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. (Raj Thackeray)

या व्हिडीओमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, ‘कुठेही हातात माईक सोपवला जातो, कोणती जागा आहे, कुठे काय आहे, लोक छान मिसळ खात आहेत, काहीजण गोड खात आहेत. खरंतर अशा ठिकाणी कोणाला बोलायला लावू नये. सनईवाल्यासमोर जर का तुम्ही चिंच खात बसलात तर त्याला सनई देखील वाजवता येत नाही. त्याच्या तोंडातून सारखी लाळ पडते. तशी काहीशी अवस्था आमची अशाप्रसंगी असते. बोलायला सांगतात आणि बाजूने सगळ्या प्रकारचे सुगंध येत असतात. तुम्ही सगळ्यांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, तसेच तुम्हा सर्वांना इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. नववर्ष आपल्या सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीचं जावो आणि निरोगी दीर्घायुष्य मिळो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’ असे म्हणत त्यांनी उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Advt.

मिसळ महोत्सव हा खवय्यांसाठी एक पर्वनीचं असते.
यात विविध प्रकारच्या मिसळींवर खाद्य प्रेमींना ताव मारता येतो.
मनसेचा मिसळ महोत्सव देखील त्याच धर्तीवर आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर
उपस्थित होते. या मिसळ महोत्सवाचा भायखळा वासियांनी चांगलाच आनंद लुटला.

Web Title :-  Raj Thackeray | at that time we were like clarinet players funny comment by raj thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | अनिल देशमुखांची अटक ही त्यांना राजकीय दृष्टीकोनातून अडचणीत आणण्यासाठीचं; आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात…

Maharashtra Karnataka Border Dispute | मुंबईला केंद्रशासित करा म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘मुंबई कोणाच्या बापाची…’