… म्हणून झेंडा बदलला, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मनसेचे कार्यकर्त्यांचे महाअधिवेशन मुंबईत पार पडले. यावेळी पक्षांच्या नविन झेंडा लॉन्च करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. राज ठाकरेंनी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ असे म्हणत भाषणाला सुरुवात केली आणि पक्षांचा नवा झेंडा आवडला का असे कार्यकर्त्यांना विचारले. यावेळी पक्षाने झेंडा का बदला याचे सविस्तर उत्तर राज ठाकरेंनी दिले.

पक्षाचा झेंडा का बदलला –
पक्षाचा झेंडा का बदलला यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की 2006 साली जेव्हा मनसे स्थापन केली तेव्हा माझ्या मनातला जो झेंडा होता तो हा झेंडा आहे. शिवतीर्थावरच्या सोहळ्यात मी सांगितले होते की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुरु केली होती तेव्हा माझे आजोबा तिथे होते. शिवसेना जी वाढली ती बाळासाहेबांच्या कर्तुत्वाने वाढली. माझ्या मनात हा झेंडा पहिल्यापासून होता परंतु मला अनेक जण भेटायला यायला लागले, सांगायला लागले की आपल्या झेंड्यात हा रंग हवा तो रंग हवा. परंतु तेव्हा मला सांगायला कोणी नव्हतं, मागे कोणी नव्हतं. परंतु माझ्या डोक्यातून हा झेंडा गेला नव्हता.

5 वर्षांपूर्वी शिवजयंतीला, गुढीपाडव्याला हा झेंडा आपण बाहेर काढला. परंतु ज्याला डीएनए म्हणतात तो हाच आहे. मग म्हटलं आपण झेंडा आणायचाच. अधिवेशनात झेंडा आणू असं ठरवलं आणि मग आज झेंडा तुमच्यासमोर आणला.

झेंडा महाराजांची राजमुद्रा, जपून हाताळा –
आपल्या झेंड्यावर महाराजांची राजमुद्रा आहे. हा झेंडा हातात घ्याल तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडायला नको. ही राजमुद्रा आपली प्रेरणा आहे. निवडणूकीच्या वेळी मात्र हा झेंडा वापरायचा नाही. राजमुद्रेचा मान हा राखलाच गेला पाहिजे. त्यामुळे आजच सांगतोय की असा गोंधळ होता कामा नये.

पक्षांचा झेंडा बदलणं हे काही मनसेच पहिल्यांदा करतय असं नाही, भाजपने देखील नाव, झेंडा बदलल्याचे उदाहरण आहे. सकारात्मक गोष्टींसाठी काही बदल आवश्यक असतात. त्यामुळे हा झेंड्यासंबंधित निर्णय घेतला आणि नव्या झेंड्याचे अनावरण केले.

फेसबुक पेज लाईक करा –