‘CAA-NRC’ वर ‘राज’ ठाकरेंची दमदार ‘भूमिका’, म्हणाले – ‘बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना देशाबाहेर काढा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मनसेच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन मुंबईत पार पडले. यावेळी पक्षांचा झेंडा लॉन्च करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. राज ठाकरेंनी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ असे म्हणत भाषणाला सुरुवात केली आणि पक्षांचा नवा झेंडा आवडला का असे कार्यकर्त्यांना विचारले. यावेळी भाषणात देशात सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी संबंधित बाबींवर भाष्य केले. यावेळी देशात अवैधपणे शिरलेल्या बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमानांना देशाबाहेर काढला अशी भूमिका त्यांनी मांडली.

भारत काय धर्मशाळा आहे का, कोणीही याचच –
पाकिस्तानी, बंग्लादेशी मुसलमानांना हकलून द्या हे मी आधीही सांगितलं होतं तेव्हा मला कोणीही विचारलं नाही, हिंदूत्वाकडे चालला आहेत का? हिंदुत्व म्हणजे काय मला सांगा. भारत काय धर्मशाळा आहे का, कोणीही याचच आणि इथं येऊन बसायच. बांग्लादेशातून भारतात यायलाय 2,500 हजार रुपये लागतात, पाकिस्तानातून भारतात नेपाळ मार्गे येतात. एनआरसी, सीएए बद्दल बोलण्याआधी ती समझोता एक्सप्रेस बंद करा, ती बस आधी बंद करा. उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बाहेर जाण्याची गरज नसेल, देशातच लढावं लागेल.

मी नरेंद्र मोदींवर टीका केली आणि योग्य वाटली तेव्हा अभिनंदन देखील केले. राम मंदिर, काश्मीर या मुद्यावर मी अभिनंदन केलं. राम मंदिरावर निर्णय आला तेव्हा मी म्हणलं होतं की, बाळासाहेब असायला हवे होते. सीएए वर चर्चा व्हावी, भारतातील लोकांवर चर्चा होईल, परंतु भारतात इतर देशातील लोकांना आणून त्यांना का पोसायचं ? सीएएच्या विरोधात देशात मोर्चे निघाले, देशातील मुसलमान रस्त्यावर आले. जम्मू काश्मीर, राम मंदिर या सर्वाच्या रागाने ते रस्त्यावर आले.

पोलिसांना मोकळे हात द्या –
आपण अनेक ज्वालामुखीवर, बॉम्बवर बसलो आहोत. सर्वात महत्वाचं आहे की, या देशातील अवैधपणे आलेले बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमानांना हकलून दिलं पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकारला माझे समर्थन आहे. आता मी देशाच्या गृहमंत्र्यांना भेटून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून याची माहिती देणार आहे. देशातील अनेक भाग असे आहेत जेथे काय होतंय हे काही कळत नाही, परंतु मला जसं समजतंय, पोलिसांकडून जशी माहिती मिळत आहे त्यानुसार काही तरी मोठं होतंय, काही तरी मोठा कट शिजतोय. असं होत असेल तर पोलिसांना मोकळे हात देणं आवश्यक आहे.

बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमानांना हकलण्यासाठी मोर्चा –
राज्यात ज्या घडामोडी घडल्या त्या टराटरा फाडायच्या आहेत पण त्या 25 मार्चला, येत्या 9 फेब्रुवारीला बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमानांना भारतातून हकलून देण्यासाठी मनसे आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढेल असे ही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like