राज ठाकरेंनी केली बाळासाहेबांची ‘कॉपी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करणारे व्यंगचित्र काढले. त्यांच्या या व्यंगचित्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ३९ वर्षांपूर्वी काढलेल्या व्यंगचित्राची झलक दिसत आहे. त्यामुळे ३९ वर्षांपूर्वीचे बाळासाहेबांनी काढलेले ते व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी काढलेले ते व्यंगचित्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात होते. बाळासाहेबांचे हे व्यंगचित्र २१ सप्टेंबर १९८० च्या मार्मिक अंकामध्ये प्रसिद्ध झाले होते. यामध्ये भारतमातेच्या गळ्याभोवती दोन बाजूंनी दोरखंड ओढताना दाखविला आहे. याला ‘…फास आवळला जातोय’ असा मथळा दिला आहे. ते व्यंगचित्र सध्या व्हायरलं झाले आहे.

दरम्यान, राज यांनी काढलेल्या व्यंगचित्रामध्ये ‘स्वतंत्रते न बघवते’ हा मथळा देत भारतमातेच्या जागी प्रजासत्ताक दाखविण्यात आले आहे. दोन्ही व्यंगचित्रे ही केंद्रातील सरकारला विरोध करणारीच आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या त्या व्यंगचित्राची कॉपी केल्याची चर्चा सोशल मीडियावर दिसत आहे.

व्यंगचित्राचा निषेध म्हणून भाजपने राज ठाकरेंनाच चढवलं फासावर
मोदींवर खरमरीत टीका