Raj Thackeray | ‘माझ्या नादाला लागू नका, अन्यथा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही’, राज ठाकरेंचा इशारा
जालना: Raj Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या बीड दौऱ्यादरम्यान (Beed) त्यांचा ताफा काल (दि.९) शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) कार्यकर्त्यांनी अडवल्याचा प्रकार समोर आला. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ताफ्यावर सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या.
इतकेच नाही तर राज ठाकरे यांच्या समोरच त्यांच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्याचे समोर आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली. राज ठाकरे सुपारी घेऊन बीडमध्ये आले असा आरोप करत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Shivsena) जिल्हाप्रमुखांसह कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घातला.
सोलापूर येथे बोलताना राज ठाकरेंनी कोणालाही आरक्षणाची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर मराठा आंदोलक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरेंकडून त्यांच्या वक्तव्याबाबत जाब विचारला जात आहे.
या सर्व प्रकरणावर राज ठाकरे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
माझ्या नादाला लागू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही,
असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यादरम्यान, त्यांनी जालन्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
यानंतर जाहीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी थेट इशारा दिला आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा