मनसैनिक सरकार विरोधात आक्रमक, जळगावात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन – राज ठाकरेंच्या ईडी चौकशीनंतर राज्यात आता मनसैनिक चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. महाजानदेश यात्रेद्वारे सरकारचे काम जनतेला सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात पोहचले तेव्हा तेथील स्थानिक मनसैनिकांकडून त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला जाणार होता मात्र त्याआधीच मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जळगावात पोहोचल्यानंतर त्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात येणार होते. पण पोलिसांनी त्याआधीच या कार्यकर्त्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जळगावमधील मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे आणि इतर तीन जणांचा समावेश आहे.

मनसे विरुद्ध सरकार संघर्ष पेटणार –

साडे आठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर येताच मनसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले ‘अशी कितीही वेळा चौकशी केली तरी माझं तोंड बंद होणार नाही.’ यामुळेच आता मनसैनिक अधिक आक्रमक होणार असल्याचे दिसून येत आहे.

राज ठाकरे यांना चौकशीला बोलावल्यानंतरही मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर ठिकाणांहूनही मनसैनिकांची धरपकड सुरु होती. मात्र राज ठाकरेंच्या आदेशामुळे अनेक मनसैनिक शांत बसून होते. मात्र राज ठाकरे बाहेर येताच अनेक मनसैनिकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आता सरकार आणि मनसैनिक यांच्यातील संघर्ष अधिक वाढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like