Raj Thackeray | भाजपने केलेल्या कामांचे ‘स्टींग ऑपरेशन’ करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. बुधवारपासून त्यांचा हा दौरा सुरु झाला असून पहिल्या दिवशी त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दरम्यान, यावेळी पुणे महानगरपालिकेचे (Pune Corporation) अंदाजपत्रक 8 हजार कोटींच्या पुढे गेले आहे. परंतु, त्यातून नागरिकांना आवश्यक त्या सुविधा मिळाल्या आहेत की नाही जर मिळाल्या नसतील तर हा निधी गेला कोठे याची माहिती घेऊन सत्ताधारी भाजपची पोलखोल करा. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणूकीसाठी प्रत्येकाने आपआपल्या वॉर्डचे संघटन मजबूत करावे असे आदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

बुधवारी सकाळी कसबा, पर्वती आणि हडपसर (Parvati and Hadapsar) विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यांनतर प्रत्येक मतदार संघाचा आढावा घेतला. प्रत्येक मतदार संघावर सुमारे दीड ते दोन तास त्यांनी चर्चा केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत बैठकांचे सत्र सुरु होते.

राज ठाकरे म्हणाले की, आगामी महापालिका निवडणूकीत प्रभाग रचना आहे की वॉर्ड रचना याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष देऊ नये. केवळ वॉर्ड रचनेला महत्त्व देऊन तेथे संघटनेची सर्व पदे भरावीत. प्रत्येक मतदारसंघातून १० नगरसेवक निवडूण येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. संघटना मजबूत करण्यावर भर द्या. त्याबरोबर प्रत्येक प्रभागात कामांवर कोट्यवधीचा खर्च झाला असून महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. परंतु, त्या मानाने प्रभागात कामे दिसत नाही किंबहूना काम झालेले पहायला मिळत नाही मात्र, त्यासाठी खर्च झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्टींग ऑपरेनच्या माध्यमातून प्रत्येक भागाची माहिती काढून सत्ताधारी भाजपची पोलखोल करा असे आदेश दिले.

या बैठकीसंदर्भात बोलताना कसबा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष गणेश भोकरे म्हणाले की,
राज ठाकरे यांनी कसबा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी सुमारे दीड तास चर्चा केली.
यावेळी त्यांनी प्रत्येक मतदार संघातून १० नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीने मनसेने काम केले पाहिजे.
सत्ताधारी भाजपने काय काम केले आहे याची पोलखोल करा,
नागरिकांपुढे हे विषय मांडा असेही सांगितले आहे.
दरम्यान, मनसेअध्यक्षांनी या पद्धतीने संवाद साधल्याने आमचे मनोबल वाढले असल्याचेही गणेश भोकरे यांनी सांगितले.

Web Title :- Raj Thackeray | explore work bjp raj thackeray order mns activists

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

OBC Reservation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, मेडिकल प्रवेशात ओबीसींना 27 % आरक्षण

Pune Metro | उद्या पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’?

PM Modi | रस्ता ओलांडताना एकाचवेळी दिसले 3000 काळे हरण, पीएम मोर्दीनी व्हिडिओ रिट्वीट करत दिली माहिती (Video)