मोदींनी तर मलाही मुर्ख बनवलं – राज ठाकरेंनी दाखवला तो व्हिडीओ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंनी आज नाशिकच्या सभेत नरेंद्र मोदींवर तुफान टीका केली. भाषणाला सुरवात करताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर तोफ डागली. काळा पैसा भारतात आणतो, ते पैसे तुमच्या  सर्वांच्या नियमित टॅक्स भरणाऱ्या नोकरदारांच्या बँक खात्यात टाकतो असं नरेंद्र मोदींनी म्हटल्याचा व्हिडीओ त्यांनी दाखवला.त्यानंतर तुम्हाला जसं मुर्ख बनवलं तसंच त्यांनी मलाही मुर्ख बनवलं अशी पश्चातापाची भावना त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे व्हिडीओ दाखवून चौफेर टीका केली. अमित शहा रॉबर्ट वाड्रा यांना तुरुंगात टाकतो असं म्हणाले. परंतु ६ महिन्यांपुर्वी अमित शहांनी आम्ही तसं कधीच म्हटलं नसल्याचा दावा केलेला व्हीडीओ दाखवला. त्यानंतर नोटाबंदी पुर्णपणे फसली. लोकांना पैसे मिळविण्यासाठी तेव्हा कसा संघर्ष कारावा लागला. याचे व्हिडीओ दाखवले.

त्यासोबतच देवेंद्र फड़णवीस यांच्यावरही हल्लाबोल करत जलसंपदा घोटाळ्याचं काय झाल?  साडेचार वर्षात अजित पवार आणि सुनील तटकरेंचं काय केलं? तो घोटाळा खरंच झाला होता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.