Raj Thackeray Grandson | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नातवाची झलक पाहिलीत का?, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray Grandson | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना नुकतंच पुत्ररत्नाचा (Raj Thackeray Grandson) लाभ झाला होता. आज राज ठाकरे यांच्या घरी त्यांच्या नातवाचा (Raj Thackeray Grandson) नामकरण सोहळा पार पडला आहे.

 

या कार्यक्रमाला त्यांच्या घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आलं आहे.

 

राज ठाकरेंचे आपल्या नातवासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सचिन मोरे यांनी आपल्या फेसबुकवरून माहिती दिली होती. 5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं होत. आजी-आजोबा होण्यासारखं दुसरं कोणतंही सुख नाही, असं शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी म्हटलं होतं. (Raj Thackeray Grandson)

 

दरम्यान, राज ठाकरेंच्या नातवाचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या आधी सचिन मोरे यांनीच फेसबूकवर पोस्ट शेअर करत “आमचे साहेब आजोबा झाले,” अशी पोस्ट केली होती. तसेच त्यांनी, “युवराजांचं आगमन” असं लिहित राज ठाकरेंना नातू झाल्याचं म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या घरी आनंदाचं वातावरण आहे.

Web Title :- Raj Thackeray Grandson | MNS chief raj thackeray s son amit thackeray became father of a son know his name and see the photos

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Department of Agriculture Raid | बोगस बियाण्यांच्या गोदामावर कृषी विभागाची छापेमारी; 2 कोंटीचा मुद्देमाल जप्त, दोघांवर FIR

Pune Crime | सराईत गुन्हेगार अक्षय दशरथ अकोलकर याच्यासह 6 जणांच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

SSC, HSC Result 2022 | 10 वी आणि 12 वीचा निकाल जूनमध्येच जाहीर होणार

ED Raid on Pooja Singhal IAS | आयएएस पूजा सिंघल यांच्या ठिकाणांवर ED ची छापेमारी, 25 कोटींची रोकड जप्त

Sanjay Raut | जितेंद्र नवलानीवर FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘भविष्यात आमच्या सारख्या लोकांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल’