Raj Thackeray | ‘चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, बैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – माझ्या भूमिका स्पष्ट असतात. बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही अशा प्रखर शब्दात राज ठाकरे (Raj Thackeray) यांना स्पष्ट केले आहे. ते पुण्यातील (Pune) पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने भाजप-मनसे युती (BJP-MNS alliance) होणार अशी चर्चा होती. यासंदर्भात माहिती देताना राज ठाकरे यांनी भाषणाच्या क्लिप चंद्रकांत पाटील यांना पाठवल्या नसल्याचा दावा केला आहे.

तर तुम्हाला क्लिप पाठवतो
पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप (video clips) पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेन. त्यांना कोणी पाठवल्या माहिती नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होते. ते हिंदी भाषिकांना आवडले. तुम्हाला समजले नसेल तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटलांना म्हणालो होतो. त्यावर त्यांनी मला पाठव, मला ऐकायला आवडेल असे म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी चर्चा केली. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असे राज ठाकरे म्हणाले.

 

बैल मुतल्यासारखा मी विचार करत नाही

मनसेने परप्रांतियांविषयीची भूमिका स्पष्ट केली तर मनसे सोबतच्या युतीबाबत विचार करुन असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते.
यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, भूमिका काय स्पष्ट करायच्या.
माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार करत नाही.
बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. तसा विचार मी करत नाही.
माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत.
त्या देशाच्या हिताच्या आहेत आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) देखील.
त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावी पाहिजे. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत.
तुम्ही आमच्यावर आक्रमण करु नका आम्ही तुमच्यावर करणार नाही.
आसाम (Assam) आणि मिझोराममध्ये (Mizoram) सध्या तेच सुरु आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

Web Title :- Raj Thackeray | i didnt send my speech video clips to bjp leader chandrakant patil says raj thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून लैंगिक शोषणाचा आरोप, म्हणाली – ‘नको-नको म्हणत असतानाही करत रहायचा KISS’

Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे दर

Pune Rain | पुण्यासह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज