राज ठाकरे ‘यांना’ घाबरतात, पहिल्यांदाच दिली कबुली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आपल्या रोखठोक भाषणातून भल्या-भल्यांना घाम फोडणारे आणि आपल्या खास ठाकरे शैलीत भाषणामुळे राज ठाकरेंना सगळेच घाबरुन असतात. मात्र, राज ठाकरे कोणाला घाबरतात हे तुम्हाला माहित आहे का? पण या प्रश्नाचे उत्तर ठाकरे यांनी दिले आहे.
[amazon_link asins=’B01F01O32E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’74fed43e-af97-11e8-9c87-0db1084bed15′]

पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये माजी आमदार कै. श्रीकृष्ण तांबे कुस्ती’ आखाड्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी आपण कुणाला घाबरतो, याचे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे यांना कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानाची भीती वाटते. ही कबुली स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

जाहिरात

राज ठाकरे यांना पैलवानाची भीती वाटते हे ऐकून उपस्थित असलेल्या सर्व मनसे कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना धक्का बसला. राजकारणात कोणत्याही नेत्याची उलट तपसणी करणाऱ्या ठाकरेंनीच आपण कोणाला घाबरतो हे पहिल्यांदाच सर्वांसमोर सांगितले.

या प्रसंगी बोलतानाही राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली. “मी कुस्ती लावायला आलोय, लढायला नाही. तेव्हा सबुरीने घ्या.” अशी विनंती राज ठाकरेंनी पैलवानांना केली. तसेच, ते पुढे म्हणाले, “नाहीतर सगळे मिळून मलाच रिंगणात घ्याल आणि लंगोटीवर घरी पाठवाल. मग बायकोनं लंगोटीवर बघितलं तर म्हणेल हे घरात कोण आलंय?” राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर अर्थातच आखाड्यात एकच हशा पिकला.

जाहिरात