स्वत:च्या काकाशी प्रामाणिक राहिले असते, तर दुसऱ्याच्या काका कडून सुपारी घ्यायची वेळ आली नसती : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज ठाकरे दुकानदारी बंद पडल्यानेच फ्रस्टेशन काढत आहेत. स्वत:च्या काकाशी प्रामाणिक राहिले असते, तर दुसऱ्याच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतलीय ते अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. राज ठाकरे यांनी सोलापूर येथील सभेत भाजपावर निशाणा साधला त्याचेच उत्तर देतांना फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल सोलापूर येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी राज ठाकरे यांनी भाजपावर कडाडून टीका केली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

त्यावेळी लोकांना शहाणपणा शिकविण्यापेक्षा तुम्ही काय केले ते सांगा? तुमच कर्तृत्व काय? लोकांनी तुम्हाला का नाकारले याचा विचार करा. केवळ चांगले भाषण करता येते म्हणजे झाले असे नाही. घरात बसून तेंडुलकरने फुलटॉस असाच खेळायला पाहिजे होते, तसाच खेळायला पाहिजे होता, हे सांगण सोपे असते. पण, प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळायला हवे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, राज ठाकरे हे रिटार्यट असून ते आता कॉमेंट्रीमनची भूमिका बजावत आहेत, माहिती नाही यांना मानधन मिळतंय की नाही, असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, राज ठाकरे ४ वर्षांपूर्वी कधी हरिसालला गेले होते का? आम्ही त्या मुलाला मॉडेल म्हणून घेतले नाही. गावातील त्या मुलानेच तिथे गेलेल्या टीमला स्वत: गाव दाखवले. गावात काय काय बदल झाले, परिवर्तन झाले हे त्या मुलानेच त्या टीमला दाखवले. मी त्याचे व्हीडिओही तुम्हाला देऊ शकतो. असेही त्यांनी म्हंटले.