‘मॅच’च फिक्स असेल तर सामने खेळून काय फायदा ? ; राज ठाकरे यांचा सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन विषयी अनेक पक्षाने शंका उपस्थित केल्या आहेत. ईव्हीएम विषयी लोकांची विश्वासार्हता नसल्याने बॅलेटपेपरद्वारेच मतदान झालं पाहिजे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७० लोकसभा मतदारसंघात घोळ असल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगासह भाजपवरही टीका केली. ज्या देशात दोन महिने निवडणुका चालतात, तिथे दोन दिवस मतमोजणी झाली तर बिघडले कुठे? असा सवाल राज यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास त्यात स्पष्टता येईल आणि लोकांचा विश्वासही बसेल, तसेच ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ झालाय. या मतदारसंघात जास्तीचं मतदान मोजलं गेलंय. याकडेही निवडणूक आयोगाचं लक्ष वेधल्याचं ते म्हणाले.

आयोगाकडून निर्णयाची अपेक्षा शून्य

निवडणूक आयोगाला ईव्हीएम संदर्भातील सर्व मुद्दे पटवून दिले आहेत. पण आयोगाचा याबाबतीत निर्णय घेण्याच्या शून्य अपेक्षा आहेत. तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? असा सवाल माध्यमांनी करू नये म्हणून ही औपचारिक भेट घेतली आहे, असं ते म्हणाले. ईव्हीएमची चीप अमेरिकेतून येते. ईव्हीएम मशीन हॅक होण्याची शक्यता आहे, असं असतानाही निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला तयार नाही. जर मॅचच फिक्स असेल तर सामने खेळून काय फायदा? असा सवाल त्यांनी केला.

सत्तेत येण्याअगोदर याविषयी गदारोळ करणारे भाजप गप्प का ?

२०१४ पूर्वी भाजपने ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवला होता. त्यासाठी कोर्टातही गेले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजप गप्प का? असा प्रश्नही त्यांनी केला. २००५ नंतर १४ वर्षाने राज ठाकरे दिल्लीत आले होते. मी आलो तेव्हा दिल्ली वेगळी होती. आता दिल्ली खूपच बदललीय. मला दिल्ली ओळखता आली नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी राहुल गांधी यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे