Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | मागील काही दिवसांपासून राज्य सरकारवर (State Govt) सातत्याने टीका करणारे मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट (Raj Thackeray Meet CM Eknath Shinde) घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ही भेट नेमकी कशासाठी होती, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी या भेटीत राज्यातील टोल नाके (Toll Plaza) आणि दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत (Marathi Name Plates ) चर्चा केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) देखील उपस्थित होते. (Raj Thackeray Meet CM Eknath Shinde)

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील टोल नाक्यांच्या प्रश्नावरून १२ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची
भेट घेतली होती. राज्यातील जनता रोड टॅक्स भरते, मग टोलचा भार कशाला, असा प्रश्न त्यावेळी राज ठाकरे त्यांनी मांडला होता. तसेच यावेळी मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) आणि अधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे यांची बैठक झाली होती. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

आजच्या भेटीत राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी टोल प्रश्न, मराठी पाट्या आणि
विविध विषयांवर चर्चा केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navardev BSc Agri | बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

Lingayat Vadhu Var | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुण्यात

Sangali News | होऊ दे खर्च! मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून हेलिकॉप्टरने गावाला तब्बल ३-४ तास प्रदक्षिणा

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

Monalisa Superhot Photo | मोनालिसाने सोफ्यावर बसून दिल्या हॉट पोज, व्हायरल फोटो पाहून नेटकरी गेले मोहून…