सत्ता स्थापनेचा ‘पॉवर गेम’ ! राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये ‘गुप्तगू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता स्थापनेच्या वाटणीवरून भाजप-सेनेत सुरु असलेला सत्तासंघर्ष संपताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात आता पॉवर गेमला सुरुवात झाली आहे. जर दोन्ही पक्षांचे जमले नाही तर काय करायचे यावर शक्यतांचा विचार केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी पडद्यामागून मोठ्या हालचाली होत असून या हालचालींना आता वेग आला असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी (दि.3) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत जात आहेत. त्याच पार्श्वभूमिवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

राज ठाकरे यांनी आज सायंकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले आणि राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा केली. ही भेट केवळ 10 मिनिटांची होती. मनसेचा 1 आमदार निवडून आल्याने अटी-तटीच्या परिस्थितीत त्या एका आमदारालाही महत्त्व येवू शकते. विधानसभा निवडणुका मनसेने स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. निवडणुका स्वतंत्र लढविल्या असल्या तरी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती झाल्या होत्या.

सत्ता स्थापनेला उशिर होत असताना शिवसेना भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र राष्ट्रवादीला जनमतात बसण्याचा कौल मिळाला असून ज्यांना जनतेने कौल दिला त्यांनी सरकार स्थापन करावे असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधीमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर अजित पवार बोलत होते.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या