Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

औरंगाबाद – पोलीसनामा ऑनलाईन – Raj Thackeray | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यावरून मोठा वाद सुरु होता. यादरम्यान मुंबई महापालिकेने (BMC) कायदा सुव्यवस्थेचं कारण देत दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई हाय कोर्टात (Bombay High Court) याप्रकरणी याचिका दाखल केली. यानंतर कोर्टाने उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava 2022) घेण्यासाठी परवानगी दिली. यादरम्यान शिंदे-ठाकरे गटातील या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याप्रकरणी सल्ला दिला होता मात्र त्यांनी तो ऐकला नाही त्यामळे हि वेळ आली असा गौप्यस्फोट मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला आहे.

 

काय म्हणाले प्रकाश महाजन?

दसरा मेळाव्याबाबत आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंनी हा मेळावा घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर राज ठाकरेंना (Raj Thackeray) मी विनंती केली होती. तेव्हा वर्षानुवर्षे दसरा मेळावा-बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे आणि यात समीकरणात आपण जाणं हे कोतेपणाचं लक्षण ठरेल. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मी फारसा उत्सुक नाही असं राजसाहेबांनी म्हटले. तसेच दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कचं राजकारण करणं हे कोतेपणाचं ठरेल असेदेखील राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले होते. राज ठाकरेंनी दिलेला सल्ला किती योग्य होता आणि राज ठाकरेंसोबत बाळासाहेबांचं असलेले नाते किती घट्ट होते हे दिसून येते.

 

दसरा मेळावा उद्धव ठाकरेंनी आनंदाने घ्यावा. यावरून विनाकारण नसेला टीकेचे लक्ष्य केले जाते हे करू नका असेसुद्धा प्रकाश महाजन म्हणाले. यादरम्यान हायकोर्टानं शिवसेनेला (Shivsena) मेळावा घेण्याची परवानगी दिली त्यानंतर लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेली. हा वाद निर्माण झाला नसता तर मेळावा व्हायचा तो सहजासहजी झाला असता. शिंदे गटानं (Shinde Group) प्रसिद्धी दिली. संजीवनी मिळाल्यासारखं शिवसैनिक (Shiv Sainik) एकमेकांना पेढे वाटत होते. खचलेली मानसिकता होती त्यात हायकोर्टाच्या निकालानं ऑक्सिजन मिळाल्यासारखं झाले असेदेखील प्रकाश महाजन यावेळी म्हणाले.

 

Advt.

Web Title :- Raj Thackeray | mns chief raj thackeray had advised eknath shinde
from Dasara Melava mns prakash mahajan secret explosion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा