Raj Thackeray | ‘यामुळे मी राजकारणावर बोलणे टाळतो’; राज ठाकरेंनी सांगितले खरे कारण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे येथे आयोजीत १८ व्या जागतिक मराठी सम्मेलनात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती ही खूप उद्विग्न करणारी आहे. त्यामुळे मी महिने – दोन महिने राजकारणावर बोलतच नाही. नारायण राणे किंवा संजय राऊत एकमेकांवर टीका करतात याच्याशी लोकांना काय देणे घेणे आहे. आणि यामुळे मी राजकीय परिस्थितीवर भाष्य करणं टाळतो. पण मग शरद पवार बोलतात, मध्येच राज ठाकरे (Raj Thackeray) येतात आणि बोलतात. अशा मिश्किल शैलीत त्यांनी शरद पवारांना टोला लगावला.

 

यावेळी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सध्या महापुरूषांबाबत जी काही वादग्रस्त वक्तव्ये राज्यात केली जात आहेत त्यावर देखील प्रकाश टाकला. जातींमध्ये तेढ निर्माण करून त्यात महापुरूषांना खेचणे, हे राजकारण नव्हे. अशा शब्दात त्यांनी महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांचा समाचार घेतला. तसेच सध्याच्या काळात कोणालाही वाटू लागलय की, मी इतिहास तज्ज्ञ आहे म्हणून. हे सर्वजण कोणताही विचार न करता बोलत असतात. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात काहीही सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकारण हे लयाला गेले असल्याचे देखील यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांना टोला लगावला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीवादी पक्ष असल्याबाबतचा आरोप केला होता. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासूनच राज्यात जातीयवादाच्या राजकारणाला सुरूवात झाली असा आरोप राज ठाकरे यांनी अलिकडच्या काळात अनेकदा केला होता. यावरून शरद पवारांनी राज ठाकरेंना लक्ष करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून पक्षाचे नेतृत्व कोणत्या नेत्याकडे होते, हे अगोदर पहावे. असा सूचक इशारा शरद पवारांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) नाव न घेता दिला. तसेच पक्षाची सुरूवात झाल्यावर सुरूवातीच्या काळात पक्षाचे नेतृत्व हे छगन भुजबळ यांच्याकडे होते. त्यानंतर विविध समाजातील नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व केले. मुळात आमच्या मनात जातीपातीचा विचार येतचं नाही. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचे लोक आहोत. त्यामुळे आम्ही राज ठाकरे यांच्या टीकेची फारशी दखल घेत नाही. असा खोचक टोला शरद पवार यांनी राज ठाकरे यांना यावेळी बोलताना लगावला.

 

त्याचप्रमाणे शरद पवार राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर पुढे बोलताना म्हणतात,
एखादी व्यक्ती तिचे मत सहा महिन्यातून व्यक्त करते यात गांभीर्याने घेण्यासारखे काहीच नाही.
मला सकाळी उठल्यावर वृत्तपत्र वाचायची सवय आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं.
असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.
तसेच अनेकजण वृत्तपत्रात काय लिहलयं हे न वाचता वक्तव्य करत असेल तर मी त्यांना दोष देणार नाही,
असा चिमटा यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना काढला.

 

Web Title :- Raj Thackeray | mns chief raj thackeray hits back ncp supremo sharad pawar in pune maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक