राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, पण माझा महाराष्ट्र सैनिक हलत नाही, याचा मला अभिमान आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी राजापूर तालुक्यात कार्यकर्त्यांची भेट घेतली.
जानेवारी महिन्यात मी पुन्हा कोकण दौरा करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका ठप्प झाल्या होत्या. पुढच्या काही महिन्यांमध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यावेळी मी पुन्हा कोकणात येणार आहे आणि मी केलेल्या सूचनांची अंमलबाजवणी झाली, की नाही हे पाहणार आहे, असे ठाकरे म्हणाले. यावेळी राजापूर तालुक्यात राज ठाकरे यांच्या साक्षीने 200 महिलांनी मनसे पक्षात प्रवेश केला आहे. गाव तिथे शाखा ही योजना राज ठाकरे यांनी कोकणात राबवली आहे. यावेळी कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थन देणाऱ्या लोकांनीदेखील राज ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्याशीदेखील राज ठाकरे यांनी चर्चा केली.
राज ठाकरे यांनी 1 डिसेंबरपासून कोकण दौरा सुरू केला. सिंधुदुर्गातून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली.
दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे यांनी या दौऱ्यात
संवाद साधला. त्यानंतर सिंधुदुर्गातील संघटनात्मक बांधणीसाठी बैठक घेतली.
राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते उपस्थित आहेत.
सिंधुदुर्गमधील भाजप आमदार नीतेश राणे यांनीदेखील राज ठाकरे यांची भेट घेतली.
Web Title :- Raj Thackeray | mns leader raj thackeray comment on maharshtra politicis raj thackeray konkan tour
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | वॉटर प्युरिफायर मटेरियल परस्पर विकून कंपनीची 48 लाखांची फसवणूक; वाघोली येथील प्रकार
COEP Cource Closed | सीओईपीचा रेल्वे-मेट्रो अभ्यासक्रम बंद; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात?