Raj Thackeray | युतीबाबत राज ठाकरेंनी केलं महत्वाचं विधान, पदाधिकार्‍यांना म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray | आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये (Mumbai) एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत काही सुचना केल्या आहेत. आगामी मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई महानगरपालिकांच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

”तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. तुमच्या मनात विषय येत असेल युतीच काय होणार ?, युती होईल की नाही ते पुढे बघू तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. महापालिका निवडणुकांसाठी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत रहा युती ही गोष्टीमध्ये अडकू नका.” असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

”निवडणुकीच्या दिवशी व्यवस्थापन कसं करायचं आहे या संदर्भातील कमिटी स्थापन करणार. उमेदवारांची नेमणूक कशी करणार ? या संदर्भातील चर्चा बैठकीत झाली. कमिटी स्थापन करून बैठका घेणार आहेत. गट अध्यक्ष यांच्या बैठक घेणार, 15 फेब्रुवारी पर्यंत अहवाल देणार आहोत.” असं बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सांगितले आहे.

पुढे संदीप देशपांडे बोलताना म्हणाले, ”युती बाबात पढू नका असं सांगितलंय, स्वतंत्र्य लढण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेने वॉर्ड रचना जरी बदलली तरी लोकांची नाराजी बदलणार नाही. शिवसेनेसोबत मराठी माणसं, हिंदू लोकं आहेत सोबत? कितीही वॉर्ड रचना बदलल्या तरी आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत पण मरण अटळ आहे.”

Web Title : Raj Thackeray | mns meeting ends raj thackeray instruct party leaders start municipal corporation election do not think about alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’