‘मनसे’कडून शिवसेना भवनासमोर ‘पोस्टरबाजी’ ! सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच ‘सम्राट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दादरमध्ये शिवसेना भवनाबाहेर मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट असा एक प्रकारचा खोचक टोलाच या पोस्टवर लिहिला गेला आहे. विशेष म्हणजे मनसेचे हे पोस्टर भगव्या रंगात आहे. त्यामुळे यापूर्वी प्रमाणे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे की मनसे भाजपसोबत युती तर करत नाहीत ना?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. याच निमित्ताने मुंबईत मनसेचे अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी मनसेने मुंबईत वातावरण निर्मितीसाठी पोस्टरबाजी सुरु केली आहे. या पोस्टरवर आणखी विशेष म्हणजे यात राज ठाकरेंचा उल्लेख ‘महाराष्ट्र धर्म सम्राट’ असा करण्यात आला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा तेव्हा राज ठाकरे आणि मनसे उभी राहिली आहे. हाच संदेश या पोस्टरमधून मांडण्याचा प्रयत्न आहे. या पोस्टरच्या माध्यमातून कोणालाही डिवचण्याचा आमचा हेतू नाही.

सरकारवर निशाणा –

संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र धर्माचे पालन करत आहोत. सत्तेसाठी सगळे आहेत परंतु महाराष्ट्र धर्माचे पालन होताना दिसत नाही. राज्यात सत्तेवर आलेले सरकार म्हणजे केवळ बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे असे म्हणत संदीप देशपांडेंनी सरकारवर टीका केली.

अंतिम निर्णय साहेबच घेतील –

मनसेचे पोस्टर भगव्या रंगात असून आता मनसेच्या झेंड्याचा रंगही बदलणार का या प्रश्नावर संदीप देशपांडे म्हणाले की, मनसेच्या झेंड्याबाबत अद्यात निर्णय झाला नाही, या संबंधित अंतिम निर्णय राज ठाकरे घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/