Raj Thackeray | पुण्यातील नागरिकांची मिळकत करातील ४० टक्के सवलत पुर्ववत सुरू करावी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray | घरमालकांना सर्वसाधारण करामध्ये सुमारे पन्नास वर्षांहून अधिक कालावधीपासून देण्यात आलेली परंतू तीन वर्षांपुर्वी बंद केलेली ४० टक्के सवलत पुर्ववत देण्यात यावी अशी मागणी मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. विशेष असे की ही सवलत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात रद्द करण्यात आली होती.

 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने (Municipal General Meeting) १९७० मध्ये घर मालकांना सर्वसाधारण करामध्ये (General Tax) ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. याची सुमारे पन्नास वर्षे अंमलबजावणी होत होती. दरम्यान, २०११ मध्ये राज्य शासनाच्या (State Government) ऑडीटमध्ये यावर आक्षेप घेण्यात आला. १० टक्क्यांपेक्षा अधिक सवलत देण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याचे कळवत ही सवलत तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यानच्या काळामध्ये महापालिकेने राज्य शासनासोबत पत्रव्यवहार करून पुर्वलक्षी प्रभावाने या आदेशाची अंमलबजावणी केल्यास नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडून विरोध होईल, असे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार ऑगस्ट २०१९ मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुर्वलक्षी प्रभावाने सवलतीचे पैसे वसुल करण्यात येउ नये, परंतू पुढील काळात ही सवलत रद्द करण्यात यावी असा निर्णय घेतला.

महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) त्यानुसार नवीन मिळकतींवर कर (Property Tax) आकारताना ४० टक्के सवलत रद्द केली. तसेच चालू आर्थिक वर्षामध्ये २०१९ पुर्वीपासून अर्थात निर्णयाच्या अगोदरपासून ज्या मिळकतींना सवलत देण्यात येण्यात होती. तिची आकारणी २०१९ पासून सुरू केली. ही रक्कम भरण्याबाबत नागरिकांना नोटीसेसही पाठविल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येउ लागला आहे. अलिकडकच्या काळात आकारणी होत असलेल्या मिळकतींचा भाडेदर दरवर्षी वाढत असल्याने कराची रक्कमही वाढत आहे. अशातच ४० टक्के सवलत रद्द करून मागील तीन वर्षाच्या थकबाकीची मागणी काही हजारांत गेल्याने नागरिकांचे डोळे विस्फारले आहेत.

 

Advt.

या पार्श्‍वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेउन निवेदन दिले आहे.
त्यामध्ये कोविडमुळे कौंटुंबिक अर्थ व्यवस्थेला हादरे बसले आहेत.
अनेकांची कर्जे थकली आहेत. रोजगार गेले आहेत. व्यवसाय बुडाले आहेत.
रोजच जगणे अवघड झाले असताना सरकारने नागरिकांना आधार द्यायला हवा.
पुण्यातील नागरिकांची रद्द केलेली ४० टक्के कर सवलत पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी
राज ठाकरे यांनी या निवेदनाद्वारे केल्याची माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर (MNS Leader Babu Vagaskar) यांनी दिली.

 

Web Title :- Raj Thackeray | MNS President Raj Thackeray’s request to Chief Minister
Eknath Shinde that 40 percent Property tax relief should be introduced for the citizens of Pune.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा