Raj Thackeray | राष्ट्रवादीने राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले, राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी – राज ठाकरे

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या शिवाजी महाराजांवरील विविध विधानांवरून वाद पेटला आहे. भाजपच्या नेत्यांनी या वादाला सुरुवात केली आहे, तर महाविकास आघाडी त्यांच्यावर टीका करत आहे. यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहेत. शिवरायांचा अपमान हा जातीय राजकारणासाठी केला जात आहे. जातीय राजकारणासाठी शिवरायांचे नाव वापरले जात आहे. या सर्वाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसने केली, असा आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे.

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना धारेवर धरले. जातीपातीच्या पलीकडे जाऊन इतिहासाकडे पाहिले पाहिजे. पण, सध्या इतिहासाकडे जातीच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. शिवरायांचा अपमान हा जातीय राजकारणासाठी केला जातो आहे. गटबाजीला चाळण लावणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीने हे जातीय राजकारण सुरू केले आहे. मराठा आणि इतर समाजांत फूट पाडण्याचे प्रयत्न यातून केले जात आहेत. 1999 पासून हे विष कालवले जात आहे, असे यावेळी राज ठाकरेंनी नमूद केले.

शरद पवार शाहू, फुले आणि आंबेडकरांचे नाव घेतात. पण, शिवाजी महाराजांचे नाव कधीही घेत नाहीत.
ते का घेत नाहीत, हे त्यांनी जाहीर करावे. आम्ही संघटनात्मक विस्कळीतपणा बाजूला करण्याचा प्रयत्न
करीत आहोत. त्यामुळे संघटनात्मक बांधणीसाठी मी दौरा काढला आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी ठाकरेंनी समान नागरी कायद्यावरदेखील भाष्य केले. आमची पूर्वीपासूनच समान नागरी कायदा आला पाहिजे, अशी भूमिका राहिली आहे. त्यामुळे आम्ही समान नागरी कायद्याच्या समर्थनात आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

Web Title :- Raj Thackeray | ncp used shivaji maharaj name for caste politics say raj thackeray targeted sharad pawar

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | माझ्यामुळे भाजपची अडचण होत असेल, तर… – उदयनराजे भोसले

Footballer Pele | ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले रुग्णालयात