Raj Thackeray Pune | पुण्यात ‘हिंदुजननायक’ राज ठाकरेंच्या हस्ते हनुमानाची महाआरती; भगवा शेला, गदा देत राज ठाकरेंचं स्वागत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray Pune | मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर (Raj Thackeray Pune) असून त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त खालकर चौकातील (Khalkar Chowk) मारूती मंदिरात (Maruti Temple) महाआरती केली आणि त्यानंतर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण केलं. राज ठाकरेंच्या या आरतीला पुण्यात मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते दाखल झाले होते.

 

हनुमान मंदिरातील आयोजकांनी यावेळी राज ठाकरे यांना भगवी शाल आणि गदा दिली. त्यासोबतच ढोल – ताशांच्या गजरात राज ठाकरेचं स्वागत करण्यात आलं. राज ठाकरे पुण्यात आल्यावर मनसेचे कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी (Posters) केली. या पोस्टरमध्ये राज ठाकरे यांना ‘हिंदुजननायक’ (Hindujananaya) अशी उपमा देण्यात आली आहे.

 

दुसरीकडे राष्ट्रवादीकडून (NCP) पुण्यात कोथरूडमध्ये (Kothrud) हनुमान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते हनुमान मंदिरात आरती करण्यात आली.
यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही (Jayant Patil) उपस्थित होते.

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मेपर्यंत अल्टिमेटम (Ultimatum) दिला आहे.
मात्र राज यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्याच पक्षातील मुस्लिम पदाधिकारी नाराज झाले आहेत.
मुंबई (Mumbai) आणि मराठवाडा (Marathwada) विभागातील एकूण 35 मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. येत्या महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

Web Title :- Raj Thackeray Pune | maha aarti from mns chief raj thackeray at maruti mandir khalkar talim in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा