Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरे यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध हा व्यापक कटाचा भाग’

गुजरात मध्ये उत्तर भारतीयांना झालेल्या मारहाणीबाबत कोणाला माफी मागायला लावणार - राज ठाकरे यांचा भाजपच्या उत्तर भारतीय नेत्यांना सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray Pune Sabha | मी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली हे काहींना खुपलं. त्यातूनच दौऱ्याला उत्तर प्रदेशातुन (Uttar Pradesh) एका खासदारचा विरोध सुरू होतो, मुंबईतून (Mumbai) ही विरोधी सूर उमटू लागले. अयोध्या दौऱ्यात (Raj Thackeray Ayodhya Tour) माझ्यासोबत येणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ऐन निवडणुकीच्या काळात तेथे विविध गुन्ह्यात अडकवायचे या व्यापक कटाची माहिती मुंबई, दिल्लीतून (Delhi) मिळाली आणि म्हणूनच मी दौरा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. (Raj Thackeray Pune Sabha)

 

12 – 14 वर्षांपूर्वीचा मुद्दा उकरून काढुन मी माफी मागावी अशी मागणी करणारे काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये (Gujarat) एका बलात्कार (Rape Case) प्रकरणानंतर 18 ते 20 हजार उत्तर भारतीयांना मारहाण करून हाकलून दिल्याप्रकरणी कोणाला माफी मागायला लावणार ? असा जोरदार हल्ला चढविताना अशा प्रथा पाडू नका, त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत असा गंभीर इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपवर नामोल्लेख टाळत दिला. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनाही हिंदुत्व फक्त म्हणून चालत नाही ते सिद्ध करावे लागते, हे भोंगे उतरवून दाखवून दिले असा टोला त्यांनी लगावला. (Raj Thackeray Pune Sabha)

मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज स्वारगेट (Swargate) येथील गणेश कला क्रीडामंच (Ganesh Kala Krida Manch) येथे सभा झाली. मागील काही सभांमध्ये महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) टीका करणाऱ्या ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाजपवर (Raj Thackeray Attack On BJP) देखिल जोरदार हल्ला चढविला. याप्रसंगी बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) , अनिल शिदोरे (Anil Shidore), अमित ठाकरे (Amit Thackeray), अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar), बाबू वागसकर (Babu Wagaskar) , किशोर शिंदे (Kishor Shinde), साईनाथ बाबर (Sainath Babar), अजय शिंदे (Ajay Shinde), गजानन काळे (Gajanan Kale), रणजित शिरोळे (Ranjeet Shirole), वसंत मोरे (Vasant More), वनिता वागसकर (Vinita Wagaskar) आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सभेसाठी आलेल्या अंध युवकांना ठाकरे यांनी व्यासपीठावर घेऊन वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

 

ठाकरे म्हणाले, सभेचे आयोजन करण्यामागचे कारण. अयोध्या दौरा तूर्तास रद्द अशा चार ओळी टाकल्या होत्या. अनेकांनी कुत्सित कंमेंट केल्या.. मुद्दाम मी सभा दोन दिवसांनी घेतली.. मी घोषणा केली अयोध्या दौऱ्याची घोषणा केली..यानंतर काय चाललंय याची माहिती घेतली. नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला सापळ्यात अडकवले जात आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. विषय पुन्हा बाहेर काढा. माझा दौरा खुपला त्यांनी रीतसर प्लॅन केला. मी अयोध्येला नक्की जाणार.. ते फक्त राम दर्शनासाठी नाही जाणार.. पण मला आठवतंय मुलायम सिंग सरकार असताना कार सेवकांना ठार मारण्यात आलं होतं. त्यांची प्रेत शरयु मध्ये तरंगत होती. त्यांचे दर्शन ही मला घ्यायच होत. मी हट्टाने जायचे ठरवले असते तर राज्यातील अनेक हिंदू बांधव अयोध्येला आले असते. तिकडे काही झाले असते तर केसेस, जेलवारी करावी लागली असती.

आपली पोर हकनाक घालवणे मला योग्य वाटलं नसते. ऐन निवडणुकीत केसेस टाकून येथे कोणालाच ठेवायचे नाही असा ट्रॅप होतो. एक खासदार मुख्यमंत्र्यांना challenge करतो, हे शक्य आहे ? 12 , 14 वर्षांनी आठवण झाली राज ठाकरे यांनी माफी मागावी , एक लक्षात ठेवावे यातून चुकीचे पायंडे पाडू नका. गुजरात मध्ये एका बलात्कार प्रकरणानंतर 18 ते 20 हजार उत्तर प्रदेश, बिहारच्या (Bihar) 18 ते 20 हजार लोकांना मारून हकलण्यात आले. तेथे कोणाला माफी मागायला लावणार. यातून लक्षात घ्या आपलं हिंदूत्व (Hindutva) कोणाला झोम्बलय असा थेट अंगुलीनिर्देश भाजपकडे केला. (Raj Thackeray Pune Sabha)

 

मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर हल्ला (Raj Thackeray Criticized Shivsena And Chief Minister Uddhav Thackeray)

 

राणा दाम्पत्य (Rana Couple) ‘मातोश्री’वर (Matoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणणार, ते काय मशीद आहे ? मी मशिदिवर भोंगे (Loudspeaker On Mosque) वाजले तर तर त्यापुढे हनुमान चालीसा लावा असे सांगितले होते. संजय राऊत लढाख मध्ये त्यांसोबत तेथे एकत्र जेवतात , गळ्यात गळे घालून फिरताहेत.

 

मुख्यमंत्र्याचे भाषणातील हिंदुत्व हे वॉशिंग पावडरच्या मेरी शर्ट तुम्हारी शर्ट से सफेद कैसी या जाहिरातीसारखे आहे. हिंदुत्व हे सांगायचे नसते सिद्ध करायचे असते.. रिझल्ट द्यावा लागतो.उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अंगावर आंदोलनाची एक तरी केस आहे का ? त्यांनी दाखवावे. संभाजी नगर च्या नामांतराचा प्रश्न सत्तेत असताना सोडवला का ? केवळ निवडणुकांसाठी हिंदुत्वाचा मुद्दा पेटवत ठेवायचा. राज्यातील अनेक शहरात पाणी नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत या विषयांना बगल द्यायची हाच यांचा अजेंडा असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.

12 – 14 वर्षांपूर्वीचे परप्रांतीयां विरोधातील ते आंदोलन
मी 12 – 14 वर्षांपूर्वी रेल्वे भरतीला उत्तरेकडून मुलं आली होती. आपले कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले होते.
तेथे एका मुलाने आपल्या कार्यकर्त्याला आईवरून शिवी दिली आणि पुढील घटना घडली.
आपल्या राज्यातील रेल्वे भरतीत बाहेरच्याना संधी कसे चालेल.
यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)
यांनी प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेत परीक्षा घेण्याचे आदेश दिले आणि स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या.
हे मनसे च्या आंदोलनाचेच यश आहे. राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतात या आरोपावरही जोरदार हल्ला
चढविताना माझ्या आंदोलनामुळे राज्यातील 60- 65 टोलनाके बंद झालेत.
तुम्ही किती बंद केले. बाकीच्यांची जबाबदारी नाही का असे म्हणत सर्वच विरोधकांवर हल्ला चढविला.

 

राज ठाकरे म्हणाले

केंद्राने समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायद्या सोबतच लवकरात लवकर संभाजी नगरचे (Sambhaji Nagar) नामांतर करावे.

 

शरद पवार (Sharad Pawar) हे बाळा साहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)
आणि पर्यायाने शिवसेनेची क्रेडीबीलिटी घालवत आहेत. परंतु शिवसेना सत्तेत मश्गुल आहे.

 

मशिदीवरील भोंग्या विरोधातील आंदोलन कायम सुरूच ठेवा नाहीतर पुन्हा आवाज वाढेल.
याबाबत जनजागृती साठी एक पत्र काढणार असून कार्यकर्त्यांनी ते घराघरात पोहोचवुन जागृती करावी.

 

औरंगजेबाचे उद्दातीकरणं करणाऱ्या MIM ला शिवसेनेनेच हिंदू – मुस्लिम ध्रुवीकरणासाठी पाळले, आज त्याचा राक्षस झाला आहे.

 

Web Title :- Raj Thackeray Pune Sabha | Raj Thackeray targets BJP; “Opposition to my visit to Ayodhya is part of a wider conspiracy,” he said.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यु; अल्पवयीन मुलासह दुचाकीमालकाविरोधात गुन्हा दाखल

 

Raj Thackeray Pune Speech | ‘निवडणूका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करायचं’ ! भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला (व्हिडिओ)

 

Vinati Organics Ltd | करोडपती बनविणारा शेअर ! 1 लाख रुपयांचे केले 15.86 कोटी रु, जाणून घ्या नाव