Raj Thackeray Pune Speech | ‘निवडणूका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करायचं’ ! भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray Pune Speech | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत (Azaan Loudspeakers) भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहे. त्यतच राज ठाकरेंचा आयोध्या दौरा, त्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray Pune Speech) स्थगित केलाला दौरा या सगळ्या मुद्यांवरुन वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांची आज (रविवार) पुण्यात सभा झाली. या जाहीर सभेत चौफेर फटकेबाजी करताना भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

 

पुण्यात झालेल्या जाहीर सभेत बोलताना मनसे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune Speech) यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. निवडणुका (Election) नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच निवडणूका आल्यावर पाहू असेही ते म्हणाले.

 

मनसेच्या पुण्यातील सभेला अंध विद्यार्थी आले होते, त्या विद्यार्थ्यांना मंचावर बसवलं. आपल्या सभेला हॉल परवडत नाही, पुण्यातील (Pune MNS) पदाधिकाऱ्यांनी एस.पी. कॉलेज (S.P. College) मिळतंय का विचारलं होतं. त्यानंतर त्यांनी देत नसल्याचं सांगितलं त्यामुळे आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदी पात्रातील सभेचा विषय सुरु होता, पावसाची (Rain) शक्यता होती, काल मुंबईतही पाऊस सुरु होता. सध्याचे पावसाळी हवामान (Rainy Weather) पाहता पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं? असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.

 

 

उद्धव ठाकरेंवर घणाघात
संभाजीनगरचा (Sambhajinagar) उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं होतं. या विधानाचा राज ठाकरे यांनी आजच्या सभेत चांगलाच समाचार घेतला. संभाजीनगर नाव होवे की न होवो, मी म्हणतोय ना…? अरे तू कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) की महात्मा गांधी (Mahatma Gandhi)? असा सवाल त्यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
तसेच लवकरात लवकर औरंगाबादचं (Aurangabad) नामकरण संभाजीनगर करा,
अशी मागणी देखील राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली.

 

तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का ? असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
आमच्या महाराष्ट्रात एमआयएमची (MIM) औलाद येते आणि औरंगाजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात.
आम्हाला लाज, शरम वाटत नाही, कारण सत्ताधारीच असे बसलेत, असंही राज ठाकरे म्हणाले.

 

 

Web Title :- Raj Thackeray Pune Speech | mns raj thackeray sabha pune at the beginning of his speech attacked sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्याच्या चंदननगर परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; न्यायालयाच्या आदेशानुसार खूनाचा गुन्हा दाखल

 

Business Idea | ‘या’ फूलाच्या शेतीतून करा लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात

 

Multibagger Stock | 4 रुपयांवरून 4000 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेअर, 1 लाखाचे झाले 10 कोटी रुपये