×
Homeताज्या बातम्याRaj Thackeray | कार्यकर्त्यांना राज ठाकरे म्हणाले - तुम्ही मला आता साधू...

Raj Thackeray | कार्यकर्त्यांना राज ठाकरे म्हणाले – तुम्ही मला आता साधू बनवता का?; उपस्थितांमध्ये पिकला हशा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) हे सध्या नाशिक दौर्‍यावर असून त्यांनी येथील सप्तश्रृंगी गडावर (Saptashrungi Gad) जाऊन देवीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी ते निफाडमध्ये आले असताना तेथील कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचे भगवी शाल आणि त्रिशूळ देऊन स्वागत केले. यावरून ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, आता मला साधू बनवता का? असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

राज ठाकरे सध्या दोन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. हा राजकीय दौरा नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Elections) पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. हा दौरा खासगी असला तरी काही कार्यकर्ते आज राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते.

 

नाशिकला येण्यापूर्वी शनिवारी शिर्डी येथे राज ठाकरे यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते.
त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांच्यासह वणी येथील आदिशक्ती सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासमवेत मनसेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

 

Web Title :- Raj Thackeray | raj thackeray in nashik visit saptshrungi devi temple people gift trushul in nifad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shahajibapu Patil | सगळेच आनंद दिघे नसतात, पण त्यांचे कार्य पुढे नेणारा एखादाच…, शहाजी पाटलांचे शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर

 Ashish Shelar | सचिन वाझे हे शिवसेनेचे कार्यकर्ते, हे ऑन रेकॉर्ड स्पष्ट, आशिष शेलारांचा आरोप

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News