Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा; म्हणाले – ‘महापालिकेच्या निवडणूका पुढे ढकलण्याचं खरं कारण…’ (व्हिडिओ)

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Raj Thackeray | महापालिका निवडणूका तोंडावर आल्या असताना त्या आणखी सहा महिने पुढे ढकलल्या. ओबीसी समाजाची मोजणी करायची म्हणून वेळ हवा असं सांगण्यात आलं. मात्र यावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला.

 

आमच्या ओबीसी समाजाचं (OBC Society) कारण पुढे केलं की त्यांची मोजणी करायची आहे वगैरे. सगळं झूट. यांना निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या. मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, आरोग्याविषयी (Health) काही बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली नाही, मला मान्य मला त्याबद्दल काही बोलायचं नाही पण खरं कारण तेच आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

 

 

निवडणूक आली की निवडणूक (Election) चढायला लागते. ती अशी अंगाला स्पर्श करते. वातावरणात यायला लागते. पण मला वातावरणात निवडणूक दिसत नव्हती. आता यांनी निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तुम्हाला सांगितलं की 3 महिन्यानंतर निवडणुका घेऊ पण त्या दिवाळीनंतरच (Diwali) होतील, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं.

 

दरम्यान, असे सत्ताधारी-विरोधक बघितले नाहीत कधी. वीट आलाय आता. शिव्या वगैरे काय देतायत, कुठली भाषा आहे.
राजकारणात (Politics) येणाऱ्या पिढ्या काय पाहातायत त्यांना वाटेल राजकारण हे असंच असतं,
असं म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरही निशाणा साधला.

 

Web Title :- Raj Thackeray | Raj Thackeray targets CM; Said – ‘The real reason for postponing the municipal elections …’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात शून्य ‘कोरोना’ मृत्यूची नोंद, मार्च महिन्यातील तिसरी वेळ, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

MNS Raj Thackeray In Pune | … म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करावी – राज ठाकरे (व्हिडिओ)

 

Hina Khan Bold Pose | हिना खाननं काळ्या रंगाच्या ड्रेसनं सोशल मीडियावर केला कहर, फोटोमध्ये दिल्या अत्यंत बोल्ड पोज

 

PMC Medical College | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टचे कामकाज ‘अध्यक्षा’ शिवाय सुरू राहाण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत