Raj Thackeray | ‘मी मास्क घालतच नाही’ असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी चक्क मास्क घातला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात महाराष्ट्रात कोरोना (Corona) बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यसाठी गर्दी आणि मास्कचा वापर करणं हाच एक उत्तम उपाय असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मास्क न घालताच अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचे दिसून आले. एका कार्यक्रमात त्यांनी ‘मी मास्क घातलच नाही’, असे म्हटले होते. मात्र, पुणे दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray) चक्क मास्क (mask) घातल्याचे पहायला मिळाले.

आगामी पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महानगरापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेकांच्या गाठी-भेटी घेतली. याच दरम्यान त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांची आज भेट घेतली. ठाकरे आणि पुरंदरे यांच्यामध्ये कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. आजच्या भेटीत एक विशेष गोष्ट म्हणजे, राज ठाकरे यांनी मास्क लावला होता.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मास्क न लावल्यामुळे ते चर्चेत आले होते.
पण सगळ्यांनी मास्क लावला होता. म्हणून मी लावला नाही,
अस राज ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले होते.
परंतु आज बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेताना त्यांनी मास्क लावल्याचे दिसून आले.
राज ठाकरे हे पुण्यात आल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत असतात.

Web Title :-Raj Thackeray | Raj Thackeray wear mask today in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

Poonam Pandey | पूनम पांडेने देखील राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; Video व्हायरल

Post Office News | 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी ! अनेक पदांसाठी भरती अन् 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या