पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Raj Thackeray Sabha In Baramati | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) प्रचाराची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरूद्ध महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा अजित पवार (Ajit Pawar) अशी लढत बारामतीमध्ये होत आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे सुप्रिया सुळे यांच्याकडून तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पत्नीसाठी मैदानात उतरले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर सर्वच उमेदवार त्यांच्या पक्षाच्या नावाचा वापर करत आहेत. मात्र, आता स्वता राज ठाकरे बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक नुकतीच अजित पवार यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत प्रचारासंबंधी चर्चा झाली असून मनसे महायुतीच्या बारामतीमधील प्रचारात उतरणार आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचे तालुकास्तरीय मेळावे घेतले जातील.
मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष सुधीर पाटसकर (Sudhir Pataskar) यांनी राज ठाकरे यांच्या सभेबाबत माहिती देताना म्हटले की,
बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा घेतली जाणार आहे.
या सभेची वेळ आणि ठिकाण अद्याप ठरलेले नाही. लवकरच ठिकाण ठरवले जाईल.
राज ठाकरेंनी महायुतील बिनशर्त पाठिंबा दिला असून मनसे पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
याबाबत जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. आता लवकरच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे सक्रीय होणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेच्या निवडणुका लढवणार नसली तरी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला भरभरुन लाभ मिळणार आहे.
राज ठाकरे यांना समाधानकारक जागा दिल्या जाऊ शकतात.
भाजप वरिष्ठ नेत्यांनी तसे आश्वासन राज ठाकरे यांना दिल्याचे बोलले जात आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Cheating Fraud Case Pune | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडे आठ लाखांची फसवणूक