Raj Thackeray | पंतप्रधान देशाचे हवेत, राज्याचे नकोत – राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातून गुजरातला प्रकल्प जाण्याचे प्रमाण मागील तीन महिन्यात वाढले आहे. शिंदे-फडणवीस युतीचे सरकार (Shinde-Fadnavis Government) राज्यात आल्यापासून राज्यातून चौथा मोठा प्रकल्प गुजरातला गेला. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ‘तुमच्यामुळे गेला’ अंक सुरु आहे. आता यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील उडी घेतली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधानांना जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे.

मुंबईत राज ठाकरे प्रसार माध्यामांसोबत बोलत होते. यावेळी ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात येणार प्रत्येक मोठा प्रकल्प गुजरातला जातोय, हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यावर विचार करायला हवा. पंतप्रधान हे देशाचे हवेत, राज्याचे नकोत. देशातील प्रत्येक राज्याकडे त्यांनी समान दृष्टीने पहायला हवे. महाराष्ट्रातील प्रकल्प आसाम किंवा अन्य कोणत्या राज्यात गेले असते, तर वाईट वाटले नसते. पण वाईट याचे वाटत आहे की, जो प्रकल्प येतोय, तो गुजरातला जातोय. पंतप्रधानांनी यात लक्ष घातले पाहिजे. प्रत्येक राज्य मोठे झाले पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योग आले पाहिजेत. तेथील नागरिकांना राज्य सोडून बाहेर जाण्याची आणि दुसऱ्या राज्यांचे ओझे होण्याची गरज पडली नाही पाहिजे, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे असे अनेक प्रकल्प इतर राज्यांत गेले पाहिजेत. महाराष्ट्र उद्योग धंद्यांच्या बाबतीत अग्रेसर आहेच. कोणत्याही उद्योगाची प्रथम पसंती महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जास्त सुविधा नाहीत आणि गुजरातमध्ये जास्त सुविधा आहेत, असे निश्चितच नाही. कल्प गुजरातमध्ये गेले असले, तरी महाराष्ट्र उद्योग धंद्यांच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे.

मुंबईत पक्ष बांधणी संदर्भात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज वांद्र्यात एक बैठक घेतली.
यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधीत केले.
यावेळी आगामी निवडणुकांसाठी पक्षात जोरदार काम सुरु असल्याचे देखील ठाकरे म्हणाले.
तसेच येणाऱ्या काळात पक्षाचे अनेक मेळावे होणार असल्याचे ठाकरेंनी साांगितले.

Advt.

Web Title :- Raj Thackeray | sad that every project is going to gujarat pm modi should think about it says raj thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा