राज ठाकरेंनी कट-पेस्टचे राजकारण सोडून ठोस भूमिका घ्यावी : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज ठाकरेंनी कट पेस्टचा राजकाणार सोडावे, सलग ठोस भूमिका घ्यावी. असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हंटले आहे. राज ठाकरेंनी आमच्यासोबत त्यांचा माणूस पाठवावा, म्हणजे डिजीटल गावची दुसरी बाजू त्यांना दिसेल. असेही त्यांनी म्हंटले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. महाराष्ट्रात आज १० ठिकाणी मतदान होत आहे. याचदरम्यान, गांधी मैदानावर आयोजित जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. पाच वर्षांत मोदी व अमित शहा यांनी जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे देश पूर्णपणे अडचणीत आला आहे. देशातील साडेपाच कोटी लोकांना मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बेरोजगार व्हावे लागले. याच पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांना कंटाळून आत्महत्या केल्या. देशातील अत्याचार थांबलेले नाहीत. तरुणांच्या हातचे काम काढून घेतले गेले. अशी टीका केली होती.

दरम्यान राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देतांना आणि राज ठाकरेंनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी व अमित शहांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आपल्या भाषणात मोदींचे जुने व्हीडिओ राज ठाकरेंकडून दाखविण्यात येत आहेत. त्यातील एका व्हीडिओत मोदींचे जवानांबद्दलचे मत दाखविण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देतांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मोदी काय म्हणाले, व्यापारी हा रिस्क घेतो, तशीच सैन्याची रिस्क असते. सैन्याकडून एकही जवान शहीद न होता, सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक होणे शक्य आहे का ? सैन्य प्लॅनिंग करुन आपले मिशन पूर्ण करते. व्यापाऱ्यालाही अशीच रिस्क घ्यायची असते. असा अर्थ मोदींच्या त्या भाषणाचा होतो. असे म्हंटले.

इतकेच नव्हे तर, त्यामुळे राज ठाकरेंनी केवळ कट-पेस्टचे राजकारण न करता ठोस भूमिका घ्यावी. असा सल्लाही त्यांनी दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like