मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी !

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत ‘ए लाव रे तो व्हिडीओ ‘द्वारे सत्ताधारी भाजपला प्रचारातून धडकी भरविणारे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा करिष्मा अखेर फोल ठरला. राजकीय पटलावर नामुष्की पत्करणारे राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह श्री सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. राज ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील निवासस्थान कृष्णकुंज येथे आज सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज ठाकरे स्वतः पत्नीसह सर्व कार्यकर्त्यांना भेटून शुभेच्छा स्विकारत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे संकेत मिळाल्याचे मनसैनिकांनी म्हटले आहे.

सिने जगत –

#Video : कटरीना हिल्स घालून ‘हुस्न परचम’ गाण्यावर लावते ठुमका…

सलमान खान म्हणतो, ‘हे’ वय लग्नासाठी एकदम ‘सही’

…म्हणून सनी लिओनी उत्‍तर प्रदेशची स्थानिक भाषा शिकतेय

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

You might also like