राज ठाकरे यांना वाहतूक कोंडीचा फटका

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

पावसाळ्यातील  वाहतुक कोंडीने पुणेकर त्रस्त झाले असताना या कोंडीचा फटका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ही बसला आहे. काल संध्याकाळी लॉ कॉलेज रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने भांडारकर इन्स्टिट्यूट येथेच गाडीतून उतरून ठाकरे यांनी पायीच  घरी जाणे पसंद केले.

मागील तीन दिवसांपासून शहरात आणि धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. रविवारी खडकवासला धरण 90 टक्के भरल्याने सोमवारी सकाळ पासून धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. नदीत पाणी सोडल्याने डेक्कन येथील भिडे पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. अशातच कर्वे रस्त्यावर मेट्रो चे काम सुरू करण्यात आल्याने वाहतुकीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी डेक्कन आणि लॉ  कॉलेज तसेच मध्यवर्ती शहरातील रस्त्यांवर कोंडी झाली होती.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5fdf91e4-8a64-11e8-b91c-513295c213f6′]

अशातच संध्याकाळी कार्यालये आणि शाळा, कॉलेज सुटल्याने कोंडीत भर पडली होती. यामुळे जंगली महाराज रस्ता, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता ब्लॉक झाले होते. काल संध्याकाळी भांडारकर इन्स्टिट्यूट येथून लॉ कॉलेज रस्त्यावरील एफटीआय समोरील घरी निघालेले राज ठाकरे वाहन कोंडीत अडकले. बराचवेळ वाहने पुढे सरकत नसल्याने ठाकरे गाडीतून उतरले आणि पायीच घरी गेले. या वाहन कोंडीची माहिती ठाकरे यांनी स्वतःच आज सकाळी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वाहन कोंडीमुळेच काल संध्याकाळी आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द करावी लागली, असे ठाकरे यांनी नमूद केले.