राज ठाकरे नेटिझन्सच्या धारेवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीं केलेल्या आरोपावर राज ठाकरे यांना नेटिझन्सनी धाऱ्यावर धरले आहे. राज ठाकरे यांनी अजित डोवाल यांच्यावर केलेल्या आरोपामुळे विरोधी पक्षातीलच नव्हे तर, मनसे सैनिकही नाराज झाल्याचे दिसून आले आहे. राज ठकरे यांच्या त्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकांचा पाऊस सुरु आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात झालेले शहीद जवान हे राजकीय बळी आहेत, यासंदर्भात अजित डोवाल या माणसाची चौकशी करा. दरम्यान सगळ्या गोष्टी बाहेर येतील. असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. राज ठकरे यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होता आहे. इतकेच नव्हे तर, राज ठकरे यांच्यावर टीकांचा पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे, ‘तुमचा मोदीविरोध एकवेळ समजू शकतो. पण तुम्ही तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सर यांच्याकडेच संशयाची सुई ठेवत आहात. या माणसाने भरपूर मोहिमा यशश्वीरीत्या पार पाडल्या आहेत ! पाकिस्तान मध्ये ग्राउंड लेव्हल ला जाऊन कामं केली आहेत….’ तुमच्या या वक्तव्याचा निषेध. अश्या अनेक प्रतिक्रिया राज ठाकरेंविरोधात येत आहेत.

विशेष म्हणजे, देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे. धाडसी आणि चाणाक्ष अधिकारी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’मध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. इतकेच नव्हे तर, डोकलाम वादाच्या वेळीही त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते. याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करण्यासाठी त्यांनी आखलेल्या रणनीतीचेही सकारात्मक पडसाद पाहायला मिळत आहेत. अजित डोवाल यांच्या मुलाचे पाकिस्तानातील उद्योगपतीशी व्यापारी संबंध असल्याची बातमी मागे आली होती. परंतु, तेव्हाही डोवाल यांची इमेज पाहून त्यांच्यावर फारशी टीका झाली नव्हती.

Loading...
You might also like